ये हैं मोहब्बते मालिकेत ऍसिड हल्ला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:05 IST2016-09-08T10:35:51+5:302016-09-08T16:05:51+5:30

टीव्ही मालिका आणि सिनेमा समाजाचा आरसा असतात असं म्हणतात. रसिकांचं मनोरंजन करण्याबरोबरच विविध सामाजिक विषयसुद्धा यातून हाताळले जातात. असाच ...

These are the acid attack in the Mohabbate series? | ये हैं मोहब्बते मालिकेत ऍसिड हल्ला ?

ये हैं मोहब्बते मालिकेत ऍसिड हल्ला ?

n style="line-height: 20px;">टीव्ही मालिका आणि सिनेमा समाजाचा आरसा असतात असं म्हणतात. रसिकांचं मनोरंजन करण्याबरोबरच विविध सामाजिक विषयसुद्धा यातून हाताळले जातात. असाच एक विषय आता ये है मोहबब्बते या मालिकेत पाहायला मिळणार असून त्यामुळं नवा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेतील आदि (अभिषेक वर्मा) सध्या प्रेमातल्या अपयशामुळे भलताच रागात आहे. आलियानं (कृष्णा मुखर्जी) त्याला नकार दिल्यानं त्याच्या अंगाचा तीळपापड झालाय. याचाच बदला घेण्याची तो वाट पाहतोय. काही कामानिमित्त आलिया बाहेर जाते. त्यावेळी एक बुरखाधारी इसम आलियावर ऍसिड हल्ला करतो. ऍसिडमुळे आलिया रस्त्यावर विव्हळत कोसळते. रस्त्यावरील जमाव तिला हॉस्पिटलमध्ये पोहचवतो असा काहीसा सीन लवकरच ये हैं मोहब्बते मालिकेत पाहायला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या सगळ्या प्रकरणाचा दोषी म्हणून आदिला अटकही होणार आहे. समाजात प्रेमाला नकार दिल्यानंतर तरुणींना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं याचं चित्रण दाखवण्याचा मालिकेचा प्रयत्न असणार आहे. मात्र आलियावरील हल्ला आदिनंच केला की यामागे दुसरं कुणी आहे?, या हल्ल्यातून आलिया कशी सावरणार याची उत्तर लवकरच ये हैं मोहब्बते मालिकेत मिळणार आहेत.  

Web Title: These are the acid attack in the Mohabbate series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.