​या अभिनेत्रीला आपल्या इमेजमुळे घालायला मिळत नाहीत शॉर्ट कपडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 12:51 IST2017-12-26T07:21:26+5:302017-12-26T12:51:26+5:30

रामायण ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली होती. या मालिकेला आज अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील कलाकार ...

These actresses can not be dressed because of their image | ​या अभिनेत्रीला आपल्या इमेजमुळे घालायला मिळत नाहीत शॉर्ट कपडे

​या अभिनेत्रीला आपल्या इमेजमुळे घालायला मिळत नाहीत शॉर्ट कपडे

मायण ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली होती. या मालिकेला आज अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या मालिकेने ऐंशीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत अरुण गोवील यांनी रामाची भूमिका साकारली होती तर दीपिका चिखलियाला प्रेक्षकांना सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. 
दीपिका चिखलियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात सुन मेरी लैला या चित्रपटाद्वारे केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राज किरण मुख्य भूमिकेत होता. पण या चित्रपटाला तितकेसे यश न मिळाल्याने तिला चित्रपटाच्या ऑफर्स मिळाल्या नाहीत. त्यामुळे ती छोट्या पडद्याकडे वळली. तिने दादा दादी की कहानी या मालिकेत काम केले. त्याच दरम्यान तिने भगवान दादा, डोरी यांसारख्या चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. पण रामायण या मालिकेमुळे तिच्या कारकिर्दीला एक कलाटणी मिळाली. रामायण या मालिकेमुळे तिला पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळाले. प्रेक्षक सीता या नावानेच तिला ओळखू लागले. अनेकवेळा तर लोक तिच्या पायादेखील पडत असत. त्यानंतर तिने विक्रम बेताल या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. तसेच घर का चिराग, रुपये दस करोड यांसारख्या चित्रपटात ती राजेश खन्ना यांची नायिका होती. त्यानंतर तिने काही दाक्षिणात्य चित्रपटात देखील काम केले. दीपिकाने तिच्या कारकिर्दीत खूप वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी प्रेक्षक तिला आजही सीता म्हणूनच ओळखतात.

Deepika Chikhalia

दीपिका चिखलियाची अनेक वर्षांपासून सीता या व्यक्तिरेखेमुळे जी काही इमेज बनली आहे, ती इमेज सांभाळण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. ती तिच्या खऱ्या आयुष्यात देखील कधीच शॉर्ट कपडे घालत नाही. याविषयी ती सांगते, आज इतक्या वर्षांनंतर देखील मी माझ्या कपड्यांच्या बाबतीत खूप जागरूक असते. लोकांना त्यांच्या सीतेला ग्लॅमरस कपड्यांमध्ये पाहायला आवडणार नाही. त्यामुळे मी सिव्हलेस कपडे अथवा शॉर्ट कपडे घालणे टाळते. मी सार्वजनिक ठिकाणी जाताना साडी अथवा जीन्स घालणेच पसंत करते. 

Also Read : ​२३ वर्षांनंतर परततेयं टीव्हीवरची पहिली ‘सीता’ ! ‘या’ चित्रपटातून करतेयं कमबॅक !!

Web Title: These actresses can not be dressed because of their image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.