ख-या आयुष्यात इतकी ग्लॅमरस दिसतेय 'सरला बहु'? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 12:41 IST2017-06-19T06:57:00+5:302017-06-19T12:41:52+5:30

'काहे दिया परदेस' मालिकेत शिव आणि गौरीच्या रोमँटीक लव्हस्टोरीने अख्या महाराष्ट्राला वेड लावलेले असताना आणखी एक व्यक्तिरेखा शिव आणि ...

Is there so much witch in the life of 'Sarala Bahu'? You will be excited by seeing the photo | ख-या आयुष्यात इतकी ग्लॅमरस दिसतेय 'सरला बहु'? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

ख-या आयुष्यात इतकी ग्लॅमरस दिसतेय 'सरला बहु'? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

'
;काहे दिया परदेस' मालिकेत शिव आणि गौरीच्या रोमँटीक लव्हस्टोरीने अख्या महाराष्ट्राला वेड लावलेले असताना आणखी एक व्यक्तिरेखा शिव आणि गौरीप्रमाणेच  रसिकांच्या मनात घर करत आहे. शिव, गौरी आणि आजी या तिन्ही व्यक्तिरेखा सोडल्या तर कोणती 'ती' व्यक्तिरेखा आहे जी रसिकांवर भुरळ घालतेय? असा तुम्ही विचार करत असालच, नाही आठवत ? अहो ही आहे आपली सरला भाभी, आता नक्कीच तुमच्या चेह-यावर थोडे हसु उमटले असणारच. होय, कारण 'सरला भाभी' आहेच इतकी भोळी आणि सोज्वळ. मालिकेत छोट्या छोट्या गोष्टींमुळे का होईना हायलाईट होतेय हे मात्र नक्की. मालिकेत सरला भाभीच आहे जी बिघडणा-या गोष्टींना मार्गी लावत असते. मालिकेत सरला भाभी खोटा सिक्का जरी वाटत असली तरी हाच खोटा सिक्का कधी कधी अशी काही जादु करून जाते की, रसिकही म्हणतात सरला भाभी तुस्सी ग्रेट हो.तुम्हाला सरला भाभी ही व्यक्तिरेखा पाहात असताना या गोष्टी जाणवत असणारच. आता आणखी एक गोष्ट तुमच्या सगळ्यांना सांगणार आहोत. ज्या गोष्टी कदाचित आजपर्यंत तुम्हाला माहिती नसतील. बहुधा त्या कधी हायलाईटच झाल्या नसतील.अशाच काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. सरला बहु म्हणून छोट्या पडद्यावर झळकत असणारी या अभिनेत्रीचं नाव आहे  'तेयाना अष्निता'. मालिकेत आदर्श सूनेप्रमाणे अम्माजीचे सगळ्या गोष्टींवर हा हा मिळवत असते. साडीमध्ये ती जितकी  सुंदर दिसते त्याहुनही ख-या आयुष्यात ती अधिक ग्लॅमरस आहे. स्क्रीनवर दिसणा-या लुकपेक्षा अधिक ग्लॅमरस आहे ही अभिनेत्री. सध्या शिव गौरी, आजी आणि सरला बहु या व्यक्तिरेखा रसिकांना फुल ऑन एंटरटेन करण्यात यशस्वी ठरत आहे.या सगळ्या व्यक्तिरेखांप्रमाणे सरला बहुला देखील रसिकांकडून अधिक पसंती मिळत आहे.  

Also Read:हा पाहा सायली संजीवचा लहानपणीचा फोटो




Web Title: Is there so much witch in the life of 'Sarala Bahu'? You will be excited by seeing the photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.