.... आणि फॅन्सना वाटले तिथे शाहरुख आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:12 IST2016-10-27T15:07:05+5:302016-10-27T16:12:13+5:30

परदेस में है मेरा दिल या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच ऑस्ट्रीयात करण्यात आले. या चित्रीकरणाच्यावेळी सर्व कलाकारांनी मिळून खूप मजामस्ती ...

There is Shahrukh and Fansna is there | .... आणि फॅन्सना वाटले तिथे शाहरुख आहे

.... आणि फॅन्सना वाटले तिथे शाहरुख आहे

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">परदेस में है मेरा दिल या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच ऑस्ट्रीयात करण्यात आले. या चित्रीकरणाच्यावेळी सर्व कलाकारांनी मिळून खूप मजामस्ती केली. मालिकेचे चित्रीकरण त्यांनी ऑस्ट्रीयातील अनेक भागात केले. या मालिकेचे चित्रीकरण करत असताना एक अतिशय मजेशीर किस्सा घडला. ऑस्ट्रीयात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याचे तिथे मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलॉविंग आहे. ऑस्ट्रीयात आतापर्यंत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. पण कोणत्याही मालिकेचे चित्रीकरण व्हायची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेचे चित्रीकरण ऑस्ट्रीयातील एका रस्त्यावर सुरू असताना तेथील लोकांनी गर्दी केली. त्यांना तिथे शाहरुख खान चित्रीकरणासाठी आला आहे असेच वाटत होते. शाहरुख एका चित्रपटात कॅमिओ करणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे असेच त्यांचे सगळ्यांचे म्हणणे होते. शाहरुखच्या चित्रपटाचे नव्हे तर एका मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे असे त्यांना सांगूनदेखील ते ऐकायलाच तयार नव्हते. याविषयी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अर्जुन बिजलानी सांगतो, "मी आणि दृष्टी चित्रीकरण करत होतो. त्यावेळी अनेक लोक आमच्या आजूबाजूला जमा झाले असल्याचे आमच्या लक्षात आले. शाहरुख ऑस्ट्रीयात खूप प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यामुळे त्यांना शाहरुखच चित्रीकरणासाठी ऑस्ट्रीयात आला असल्याचे वाटले. त्यांना शाहरुखची एक तरी झलक पाहायची होती आणि काही केल्या ते तिथून जायलाच तयार नव्हते. त्यांचा काही तरी गैरसमज झाला आहे हे समजवण्यात आमच्या सगळ्यांच्या नाकी नऊ आले होते. आम्हाला यामुळे तीन तास चित्रीकरण थांबावे लागले होते."










 

Web Title: There is Shahrukh and Fansna is there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.