कपिलला सोडण्याचा विचारदेखील नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 14:58 IST2016-06-18T09:28:31+5:302016-06-18T14:58:31+5:30
कॉमेडी नाईटस विथ कपिल या कार्यक्रमामुळे चंदन प्रभाकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या कार्यक्रमानंतर तो सध्या कपिलसोबतच द कपिल शर्मा ...

कपिलला सोडण्याचा विचारदेखील नाही
क मेडी नाईटस विथ कपिल या कार्यक्रमामुळे चंदन प्रभाकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या कार्यक्रमानंतर तो सध्या कपिलसोबतच द कपिल शर्मा शोमध्ये झळकत आहे. आता तो इंडियन मझाक लीग या नव्या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. या कार्यक्रमात व्रजेश हिरजी, सलोनी देना आणि रश्मी देसाईही काम करणार आहेत. चंदन इंडियन मझाक लीग या कार्यक्रमात काम करणार असल्याने तो द कपिल शर्मा शो सोडणार असल्याचीही चर्चा होती. या कार्यक्रमाचा निर्माता कपिलला चंदनने दुसऱया कोणत्याही कार्यक्रमात काम केल्यास काहीही समस्या नसल्याने कार्यक्रम सोडण्याचा प्रश्नच येत नाही असे चंदन सांगतो.