‘शनाया’च्या आयुष्यातील खराखुरा ‘गॅरी’ आहे हा अभिनेता?जाणून घ्या कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 15:03 IST2017-11-09T06:34:47+5:302017-11-09T15:03:49+5:30

‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजते आहे. शनाया, गुरुनाथ आणि राधिका यांची जुगलबंदी रसिकांच्या पसंतीस पात्र ...

Is there a genuine 'Gary' in 'Shaniya' life? Who is it? | ‘शनाया’च्या आयुष्यातील खराखुरा ‘गॅरी’ आहे हा अभिनेता?जाणून घ्या कोण आहे तो?

‘शनाया’च्या आयुष्यातील खराखुरा ‘गॅरी’ आहे हा अभिनेता?जाणून घ्या कोण आहे तो?

ref="http://cnxmasti.lokmat.com/television/did-you-know/trp-ratings-mazhya-navryachi-bayko-has-occupied-the-1st-slot-pushing-tujhyat-jeev-rangala-to-2nd-place/25675">‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजते आहे. शनाया, गुरुनाथ आणि राधिका यांची जुगलबंदी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे शनाया या व्यक्तीरेखेचा. अभिनेत्री रसिका सुनील हिनं ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली आहे. मौजमजा आणि धम्माल जीवन जगण्यासाठी गॅरी म्हणजेच गुरुनाथला आपल्याकडे आकर्षित करणारी शनाया ही भूमिका रसिकानं मोठ्या खुबीनं रंगवली आहे. त्यामुळे शनाया या पात्रावर प्रेम करणारे आणि तिचा तिरस्कार करणारे असे दोन्ही प्रकारचे रसिक आहेत. शनाया म्हणजे रसिकाच्या मालिकेतील कारनाम्यांमुळे तिच्या रिअल लाइफमध्ये काय सुरु असते हे जाणून घेण्याचीही रसिकांना तितकीच उत्सुकता असते. नुकतंच शनाया म्हणजेच रसिका हिनं नवी कोरी कार खरेदी केली. त्या कारचा फोटो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. तिच्या या पोस्टला रसिकांचा भरभरुन प्रतिसाद लाभला. सोशल मीडियावर रसिका बरीच एक्टिव्ह असते आणि वेगवेगळे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरील असाच आणखी एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.



या फोटोंमध्ये शनाया म्हणजेच रसिका आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर एकत्र पाहायला मिळत आहेत. या फोटोत दोघांचे अनेक फोटो आहेत. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो किंवा मग एकत्र सिनेमाला जाणे असो, प्रत्येक क्षणाचे फोटो रसिकाने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे रिल लाइफमध्ये गॅरीवर लट्टू होणारी शनाया म्हणजेच रसिकाचा रिअल लाइफ गॅरी हा सिद्धार्थ चांदेकर तर नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आता या फोटोचं वास्तव काय आहे हे फक्त शनाया म्हणजेच रसिका आणि सिद्धार्थलाच माहिती आहे. येत्या काळात या फोटोचे गुपितही नक्कीच समोर येईल. मात्र या बातमीमुळे शनायाचा रिअल लाइफ गॅरी बनण्याचं स्वप्न बघणा-या तिच्या फॅन्सचं हार्ट ब्रेक झालं असणार हे मात्र नक्की !

Web Title: Is there a genuine 'Gary' in 'Shaniya' life? Who is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.