क्षीती जोगच्या गाडीची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 14:08 IST2016-07-05T08:38:55+5:302016-07-05T14:08:55+5:30
क्षीती जोग सध्या ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणानंतर ती तिच्या घरी ...

क्षीती जोगच्या गाडीची चोरी
क षीती जोग सध्या ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणानंतर ती तिच्या घरी रात्री उशिरा परतली आणि तिने तिची गाडी बिल्डिंगच्या खाली उभी केली होती. तिच्या बिल्डिंगच्या खालून तिची गाडी चोरीला गेली आहे. तिने यासंबंधित तक्रारही पोलिसांकडे दाखल केली आहे. क्षीती गोरेगावमध्ये राहते. तिच्या बिल्डिंगमध्ये केवळ एकच गाडी उभी करण्याची परवानगी आहे आणि त्यामुळे तिने तिची गाडी बिल्डिंगपासून जवळच उभी केली होती. पण सकाळी गाडी त्याजागी उभी नसल्याचे तिच्या लक्षात आले. लगेचच क्षीतीच्या नवऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावर त्याच परिसरात आणखी एक गाडी त्याचदिवशी चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस याबाबत सध्या चौकशी करत असल्याचे क्षीतीने सांगितले.