'हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस'ची स्टारकास्ट 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये झाली सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:53 IST2025-12-31T18:52:23+5:302025-12-31T18:53:26+5:30

'Happy Patel: Khatarnak Detective Movie : आमिर खान प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसची टीम आयकॉनिक गेम शो 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर पोहोचली.

The star cast of 'Happy Patel: Khatarnak Detective' participated in the show 'Kaun Banega Crorepati' | 'हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस'ची स्टारकास्ट 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये झाली सहभागी

'हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस'ची स्टारकास्ट 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये झाली सहभागी

आमिर खान प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसची टीम आयकॉनिक गेम शो कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर पोहोचली. या शोचे सूत्रसंचालन मेगास्टार अमिताभ बच्चन करत आहेत. हॉट सीटवर मोना सिंग आणि वीर दास दिसले, तर या भागात मिथिला पालकर आणि शरीब हाशमी यांचाही सहभाग आहे. हा एपिसोड ज्ञान, विनोद आणि बेधडक गप्पांचा सुरेख संगम सादर करणार असून सिनेमा आणि टेलिव्हिजनप्रेमींसाठी तो नक्कीच पाहण्यासारखा अनुभव ठरणार आहे.

आमिर खान प्रोडक्शन्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “हॅप्पी पटेल आणि टीम कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर! उद्या रात्री ९ वाजता सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ट्यून इन करा आणि ही धमाल पाहा.”


अलीकडेच प्रदर्शित झालेल्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसच्या ट्रेलरने मजा एका नव्या पातळीवर नेली आहे. उच्च दर्जाच्या विनोदाने भरलेल्या या ट्रेलरमध्ये अनेक मनोरंजक आणि अनोखे क्षण पाहायला मिळतात, जे पूर्णपणे एंटरटेनिंग चित्रपटाचे आश्वासन देतात. दिग्दर्शक आणि अभिनेता या दुहेरी भूमिकेत वीर दास आपल्या ताज्या, क्वर्की कॉमेडी स्टाइलसह भरपूर हसवण्यासाठी सज्ज आहेत. ऊर्जा, आकर्षण आणि युथफुल वाइबने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाच्या रिलीजबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतो. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसचे दिग्दर्शन वीर दास यांनी केले असून हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title : 'हैप्पी पटेल' की टीम 'कौन बनेगा करोड़पति' में शामिल हुई।

Web Summary : 'हैप्पी पटेल: खतरनाक जासूस' के कलाकार अमिताभ बच्चन द्वारा होस्ट किए गए 'कौन बनेगा करोड़पति' में शामिल हुए। मोना सिंह, वीर दास, मिथिला पालकर और शरीब हाशमी ने भाग लिया। एपिसोड ज्ञान, हास्य और मनोरंजन से भरपूर है। वीर दास द्वारा निर्देशित फिल्म 16 जनवरी, 2026 को रिलीज होगी।

Web Title : 'Happy Patel' cast joins 'Kaun Banega Crorepati' show.

Web Summary : The cast of 'Happy Patel: Khatarnak Jasoos' visited 'Kaun Banega Crorepati' hosted by Amitabh Bachchan. Mona Singh, Vir Das, Mithila Palkar, and Sharib Hashmi participated. The episode promises knowledge, humor, and entertainment. The film, directed by Vir Das, releases on January 16, 2026.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.