सातव्या मुलीची सातवी मुलगी: पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत आहे इंद्राणी-नेत्राच्या तत्वांचे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 12:48 PM2023-11-16T12:48:33+5:302023-11-16T12:49:27+5:30

satvya mulichi satvi mulgi: वावोशी गावात स्मशानभूमीत दुसरी पेटी सापडली आहे.

The seventh daughter of the seventh daughter: In the second box of Panchapitika is the secret of the principles of Indrani-Netra! | सातव्या मुलीची सातवी मुलगी: पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत आहे इंद्राणी-नेत्राच्या तत्वांचे रहस्य !

सातव्या मुलीची सातवी मुलगी: पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत आहे इंद्राणी-नेत्राच्या तत्वांचे रहस्य !

झी मराठीवर सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तुफान गाजत आहे. या मालिकेत पंचपिटिका रहस्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या पंचपिटिका रहस्याचं पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. नुकतंच पहिल्या पेटीचं रहस्य उलगडलं आहे. त्यामुळे दुसऱ्या पेटीतून काय रहस्य बाहेर पडेल? ही पेटी कोणाच्या हाती लागणार असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडत आहेत. 

वावोशी गावातील स्मशानभूमीत दुसरी पेटी आहे. परंतु, त्या ठिकाणी प्रेत जळत असल्यामुळे इंद्राणी आणि नेत्राला ती पेटी बाहेर काढता येईना. मोठ्या प्रयत्नाने त्या दोघी ही पेटी काढायचा प्रयत्न करतात. परंतु, त्यावेळी रुपाली तिथे येते आणि इंद्राणी-नेत्राला जाळायचा प्रयत्न करते. मात्र,रुपालीला विरोध करत नेत्रा-इंद्राणी दुसऱ्या पेटीचा ताबा मिळवतात. विशेष म्हणजे दुसरी पेटी मिळाल्यानंतर इंद्राणीला तिच्या कलियुगात असण्यामागचा अर्थ कळतो. या पेटीत इंद्राणीसाठी एक मजकूर असतो. या मजकुरावरुन तिला कळतं की नेत्रासोबत तिचं असणं एका खास कारणासाठी जुळून आलं आहे.

दरम्यान, पहिल्या दोन पेट्या इंद्राणी आणि नेत्राच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे तिसरी पेटी मिळवण्यासाठी रुपाली वाट्टेल त्या थराला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ही तिसरी पेटी कोणाला मिळते, त्या पेटीतून कोणाचं रहस्य समोर येणार आहे या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

Web Title: The seventh daughter of the seventh daughter: In the second box of Panchapitika is the secret of the principles of Indrani-Netra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.