भारती सिंगच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलक आली समोर, 'काजू'ला पाहून कॉमेडियन झाली भावुक, म्हणाली - "खूपच गोड आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:17 IST2025-12-24T14:17:01+5:302025-12-24T14:17:28+5:30
Bharti Singh : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने मुलगा 'काजू'ला जन्म दिला, मात्र जन्मानंतर काजू लगेच भारतीकडे आला नव्हता. अखेर २ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भारतीची आपल्या लाडक्या लेकाशी भेट झाली आहे.

भारती सिंगच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलक आली समोर, 'काजू'ला पाहून कॉमेडियन झाली भावुक, म्हणाली - "खूपच गोड आणि..."
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी १९ डिसेंबर रोजी दुसऱ्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. तिला दुसरापण मुलगाच झाला. डिलिव्हरीनंतर भारती हॉस्पिटलमधूनच व्लॉग बनवून चाहत्यांना अपडेट्स देत आहे. तिने आपल्या व्लॉगमध्ये सांगितले होते की, काजूला रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आता सर्व चाचण्यांनंतर काजूला भारतीकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीने तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये छोट्या काजूला पहिल्यांदा कुशीत घेतल्याचे दाखवले आहे. मुलाला जवळ घेताच भारतीला आपले अश्रू अनावर झाले. व्लॉगच्या सुरुवातीपासूनच ती काजूची आतुरतेने वाट पाहत होती. जेव्हा नर्सने काजूला रूममध्ये आणले, तेव्हा भारती अतिशय भावुक झाली. ती म्हणाली, "तर फायनली काजू इथे आला आहे. हाय! गाईज, हा किती गोड आहे बघा. थोड्या वेळापूर्वीच गोला आणि हर्ष घरी गेले आहेत. जर काजू थोडा लवकर आला असता, तर त्यांचीही भेट झाली असती."
"अगदी गोलासारखाच दिसतोय..."
काजूला कुशीत घेऊन त्याचे मुके घेत भारती पुढे म्हणाली, "हा आता माझ्याकडे आला आहे. खूपच सुंदर आणि हेल्दी बाळ आहे, अगदी गोलासारखाच (लक्ष्य) दिसतोय. याची ओढ माझ्याकडे आहे की कोणाकडे हे माहीत नाही, पण लवकरच आम्ही तुम्हाला त्याचा चेहरा दाखवू. माझा काजू माझ्या हातात आहे. गणपती बाप्पा मोरया! तो नेहमी आनंदी आणि निरोगी राहो. दोन दिवसांनंतर बाळ मिळालंय यार!"
भारती सिंगने सध्या 'लाफ्टर शेफ्स ३'मधून ब्रेक घेतला आहे. गेल्या आठवड्यातील एपिसोडमध्ये ती दिसली होती, मात्र आता काही काळ ती शोमध्ये दिसणार नाही.