घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:45 IST2025-11-16T14:45:01+5:302025-11-16T14:45:57+5:30

तेजस्वी प्रकाश फक्त अभिनेत्रीच नाही तर स्मार्ट बिझनेसवुमन आहे.

tejasswi prakash gives financial advice says should invest more eventually going to earn more | घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला

घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला

तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'बिग बॉस' सीझन १५ ची ती विजेती आहे. याच सीझनमध्ये तेजस्वी आणि अभिनेता करण कुंद्रा प्रेमात पडले. आज हे चाहत्यांचं आवडतं कपल आहे. तेजस्वी प्रकाश मराठी सिनेमांमध्येही दिसली. तसंच तिने अनेक हिंदी रिएलिटी शोही केले. इतकंच नाही तर तेजस्वी उत्तम बिझनेसवुमन आहे. तिने अनेक ठिकाणी गुंतवणूक करुन ठेवली आहे. दुबईतही तिचा फ्लॅट आहे. तेजस्वीने घरबसल्या पैसे डबल करण्याविषयी नुकतंच एका मुलाखतीत भाष्य केलं. तसंच तिने मुलींसाठी मोलाचा आर्थिक सल्ला दिला.

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये तेजस्वी नुकतीच आली होती. तेजस्वीला सतत काम करायची आवड आहे. तिने बिग बॉस शोही यासाठी केला कारण त्यावेळी कोव्हिड होता आणि तिला काम करायचं होतं. तर रिकाम्या वेळीही तिला काही ना काही काम करायचं असतं. म्हणूनच आज ती अभिनेत्रीच नाही तर रिअल इस्टेट बिझनेसही सांभाळते. ती सांगते, "ज्यातून पैसा कमवू शिकू अशा गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. जर मी एखाद्या कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करते, तर मला माहित आहे की मला घरबसल्या तिथून भाडं मिळणार आहे. मी त्या प्रॉपर्टीचा वापर करत नसले तरी मला घरबसल्या त्यातून फायदा होत आहे. त्यामुळे हा खर्च नाही तर ती गुंतवणूक आहे जी तुम्हाला पैसे कमवून देते. "

ती मुलींना सल्ला देत म्हणते, "मुलींनो, महागड्या गोष्टी खरेदी करण्याचा दबाव खूप सहज आपल्यावर येतो. मी कित्येक मुलींना महागडी घड्याळं आणि हाय हील्स खरेदी करताना पाहते. मी सुद्धा नुकतंच रोलेक्स घड्याळ खरेदी केलं पण या गोष्टी मला सहज परवडतील तेव्हाच मी ते खरेदी करेन हा मआझा स्वत:चा निर्णय आहे. आज जर मी एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करते तर मी महागडे घड्याळ घेऊ शकत नाही हा विचार करणं मूर्खपणाचं ठरेल. पण असं न करता मी गुंतवणूक करु आणि वेगवेगळ्या प्रॉपर्टी बनवू हा माझा स्वत:चा अगदी स्पष्ट निर्णय आहे."

Web Title: tejasswi prakash gives financial advice says should invest more eventually going to earn more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.