'दीदी को क्यूँ तोडा?', करणच्या वाढदिवसाला तेजस्वीची पोस्ट; अनुषा दांडेकरवर साधला निशाणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:39 IST2025-10-16T12:37:24+5:302025-10-16T12:39:20+5:30
तेजस्वीच्या पोस्टवर करणची कमेंट, 'दीदी को क्यूँ तोडा?'

'दीदी को क्यूँ तोडा?', करणच्या वाढदिवसाला तेजस्वीची पोस्ट; अनुषा दांडेकरवर साधला निशाणा?
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कपल आहे. बिग बॉस १५ मध्ये असताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. ४ वर्षांपासून त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांना भुरळ घालत आहे. दरम्यान करण कुंद्राचे याआधी अनेकांसोबत अफेअर झाले आहेत. तेजस्वीआधी तो अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही दिवसांपूर्वी अनुषाने नाव न घेता करण कुंद्रावर विश्वासघाताचा आरोप केला होता. आता करणच्या वाढदिवसाला तेजस्वीने पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षरित्या अनुषालाच सडेतोड उत्तर दिलं आहे.
तेजस्वी प्रकाशने करणसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले, "आता तो फक्त माझ्यासाठीच राईट स्वाईप करतो. माझ्या स्वप्नातला राजकुमार, हॅपी बर्थडे करण." करणने तेजस्वीच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले, 'दीदी को क्यूँ तोडा'. या कमेंटवर नेटकऱ्यांनाही हसू आवरलेलं नाही.
करण आणि अनुषाचं नातं अनेक वर्ष चर्चेत राहिलं. २०२० मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर बिग बॉस १५ शोमध्ये त्याची तेजस्वीसोबत ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. करण तेजस्वीहून ९ वर्षांनी मोठा आहे. तेजस्वीसोबतच्या नात्यामुळे सुरुवातीला त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
अनुषा दांडेकर काय म्हणाली होती?
अनुषा दांडेकर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत नाव न घेता ती म्हणालेली की, "माझ्या आधीच्या बॉयफ्रेंडने माझा विश्वासघात केला होता. माझ्यामुळे आम्हाला दोघांना एका डेटिंग अॅपचं कॅम्पेन मिळालं होतं. तेव्हा मला कळलं की माझा बॉयफ्रेंड तर त्याच अॅपवरुन इतर मुलींना भेटत आहे. नंतर मला कळलं की मुंबईतील अनेक मुलींसोबत त्याचं अफेअर राहिलं आहे."