किशोरी बनणार गुरू माँ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:18 IST2016-09-08T10:48:33+5:302016-09-08T16:18:33+5:30

शक्ती... अस्तित्त्व के एहसास की या मालिकेत लवकरच किशोरी शहाणेची एंट्री होणार आहे. सौम्या तृतीयपंथीय असल्याचे तिला कळल्यावर ती ...

Techie will become a teacher's mother | किशोरी बनणार गुरू माँ

किशोरी बनणार गुरू माँ

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">शक्ती... अस्तित्त्व के एहसास की या मालिकेत लवकरच किशोरी शहाणेची एंट्री होणार आहे. सौम्या तृतीयपंथीय असल्याचे तिला कळल्यावर ती आता आपले घर सोडून तृतीयपंथीयांसोबतच राहायला जाणार आहे. तिथे तृतीयपंथीयाच्या गुरूला जाऊन ती भेटणार आहे. ही गुरूमाता तिला तिच्या खऱ्या आयुष्याशी तिची ओळख करून देणार आहे. तृतीयपंथीयांना समाजात काहीच स्थान नसते असे या गुरूमातेचे म्हणणे आहे. ती सगळ्या परिस्थित सौम्याच्या पाठीशी उभा राहाणार आहे. पण त्याचसोबत सौम्याने आता इतर तृतीयपंथीयांप्रमाणे घरोघरी जाऊन पैसे मागावेत असेही तिला ती सांगणार आहे. या मालिकेतील गुरू माँची भूमिका ही खूप महत्त्वाची असल्याने ही भूमिका साकारण्यासाठी किशोरी शहाणेची निवड करण्यात आली आहे. 

Web Title: Techie will become a teacher's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.