तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नट्टू काका आणि बाघा सोडणार जेठलालाचे गडा इलेक्ट्रॉनिक्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:51 IST2017-10-16T07:12:40+5:302017-10-16T17:51:40+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाची देखभाल नट्टू काका आणि बाघा अनेक वर्षांपासून करत ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नट्टू काका आणि बाघा सोडणार जेठलालाचे गडा इलेक्ट्रॉनिक्स?
ारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाची देखभाल नट्टू काका आणि बाघा अनेक वर्षांपासून करत आहेत. हे दोघे या दुकानाचे आधारस्तंभ आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. नट्टू काका तर हे दुकान सुरू झाल्यापासूनच या दुकानात काम करत आहेत तर बाघा देखील गेल्या अनेक वर्षांपासून या दुकानात काम करत आहे. जेठालाल या दोघांनीही कधीही दुकानातले नोकर न मानता त्यांना त्याच्या घरातले सदस्यच मानतो. जेठालालच्या घरातील प्रत्येक कार्यक्रमात बाघा आणि नट्टू काका नेहमीच असतात. नट्टू काका आणि बाघा यांचे जेठालाल सोबतचे नाते खूपच चांगले आहे.
पगार वाढवून द्या असे सतत जेठालालला नट्टू काका आणि बाघा सांगत असतात. पण जेठालाल काही केल्या त्यांचे ऐकत नाही. आता तर नट्टू काका आणि बाघा यांना छेडा इलेक्ट्रॉनिक्समधून खूप चांगली ऑफर आली आहे. छेडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक त्यांना दुप्पट पगार, दुप्पट सुट्ट्या द्यायला तयार झाला आहे. पण त्याच्याकडे नोकरीला जायचे की नाही या द्विधा मनस्थितीत नट्टू काका आणि बाघा आहेत. नट्टू आणि बाघा छेडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाऊन जेठालालच्या दुकानाची बदनामी करत आहेत असे जेठालालला अनेकजण फोन करून सांगत आहेत आणि त्यामुळे जेठालाल आता प्रचंड चिडला आहे. बागा आणि नट्टू काका दुकानात परत आल्यानंतर जेठालाल त्यांच्यावर प्रचंड चिडणार आहे आणि तुम्हाला मी घरातल्यांसारखे वागवून खूप चूक केली असे त्यांना सांगणार आहे. तसेच तुम्ही माझ्या विश्वासाला तडा दिला असे सांगत त्यांना नोकरी सोडून जायला सांगणार आहे. पण यावर नट्टू काका स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जेठालाल काहीही ऐकायच्या मनस्थितीत नसल्याने शेठजीचा आपल्यावर विश्वास नाही तर आपण काय थांबायचे असे म्हणत बाघा नट्टू काकाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे आता नट्टू काका आणि बाघा परत येणार का आणि त्यांना परत आणण्यासाठी जेठालालला काय काय करावे लागणार हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मामधील दया म्हणजेच दिशा वाकानीच्या ओटीभरणाला उपस्थिती लावली तिच्या ऑनस्क्रीन मुलाने