तारकमधील अय्यर खऱ्या आयुष्यात आहे पोपटलाल, आजही आहे अविवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 17:20 IST2021-04-03T17:17:29+5:302021-04-03T17:20:23+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पोपटलालचे लग्न झालेले नसून तो लग्नासाठी मुली शोधत असल्याचे दाखवण्यात येते. पण खऱ्या आयुष्यात तनुजचे अजून लग्न झालेले नाही.

tarak mehta ka ooltah chashmah iyer aka tanuj mahashabde is still unmarried | तारकमधील अय्यर खऱ्या आयुष्यात आहे पोपटलाल, आजही आहे अविवाहित

तारकमधील अय्यर खऱ्या आयुष्यात आहे पोपटलाल, आजही आहे अविवाहित

ठळक मुद्देतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या फॅन्सना पोपटलालच्या लग्नाची चिंता लागलेली असते. पण खऱ्या आयुष्यातील पोपटलाल अय्यर आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अय्यरची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत ही भूमिका तनुज महाशब्दे साकारत आहे. या मालिकेत तनुज दाक्षिणात्य भूमिका साकारत असून त्याची हिंदी बोलण्याची ढब देखील एखाद्या दाक्षिणात्य माणसाप्रमाणेच आहे. त्यामुळे तो खऱ्या आयुष्यात देखील दाक्षिणात्य असेल असेच सगळ्यांना वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात तनुज हा महाराष्ट्रीयन आहे. 

तनुज लहानाचा मोठा इंदौरमध्ये झालेला आहे. तो कामाच्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वी मुंबईत आला. या मालिकेत बबिता ही त्याची पत्नी असून ती खूपच सुंदर आहे असे आपल्याला पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का खऱ्या आयुष्यात तनुजचे लग्न झालेले नाही.

या मालिकेत पोपटलालचे लग्न झालेले नसून तो लग्नासाठी मुली शोधत असल्याचे दाखवण्यात येते. पण पोपटलालची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या श्याम पाठकचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले देखील आहेत. पण तनुजचे अजून लग्न झालेले नाही. तनुज खऱ्या आयुष्यात त्याच्या आयुष्यातील बबिता शोधत आहे. तो खऱ्या आयुष्यात अद्याप अविवाहित आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या फॅन्सना पोपटलालच्या लग्नाची चिंता लागलेली असते. पण खऱ्या आयुष्यातील पोपटलाल अय्यर आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah iyer aka tanuj mahashabde is still unmarried