तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये हा कलाकार साकारतो मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे तो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 15:08 IST2020-12-19T14:49:52+5:302020-12-19T15:08:55+5:30

या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

tarak mehta ka ooltah chashmah babuji aka amit bhatt real life pictures | तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये हा कलाकार साकारतो मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे तो?

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये हा कलाकार साकारतो मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे तो?

ठळक मुद्देतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या आधी दिलीप जोशीसोबत अमितने काही नाटकांमध्ये काम केले होते. त्यामुळे दिलीप आणि अमित यांचे बाँडिंग खूपच चांगले आहे. ही मालिकादेखील अमितला दिलीप जोशीमुळेच मिळाली.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल, बाबूजी या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत बाबूजींच्या म्हणजेच चंपक चाचाच्या भूमिकेत आपल्याला अमित भटला पाहायला मिळत आहे. या मालिकेत चंपक चाचा हे वयस्कर दाखवण्यात आले असले तरी खऱ्या आयुष्यात अमित हा वयाने तरुण आहे. या मालिकेत बाबूजींच्या मुलाच्या भूमिकेत असलेल्या जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीपेक्षा अमित वयाने लहान आहे. त्यामुळे अमितचा हा फोटो पाहून तारक मेहताच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसला असेल यात काहीच शंका नाही.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या आधी दिलीप जोशीसोबत अमितने काही नाटकांमध्ये काम केले होते. त्यामुळे दिलीप आणि अमित यांचे बाँडिंग खूपच चांगले आहे. ही मालिकादेखील अमितला दिलीप जोशीमुळेच मिळाली. अमितनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. चंपक चाचाच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांनी ऑडिशन दिले होते. पण या भूमिकेसाठी कोणताच कलाकार निर्माते असित मोदी यांना आवडत नव्हता. त्यामुळे दिलीप जोशीनेच अमितचे नाव सुचवले. दिलीप यांच्या सांगण्यावरून अमितला असित मोदी यांनी भेटायला एका हॉटेलमध्ये बोलावले होते. अमितशी गप्पा मारल्यानंतर पाचच मिनिटांत असित मोदी यांनी अमितला या भूमिकेसाठी निवडले. या भूमिकेसाठी अमितला कोणतेही ऑडिशन देखील द्यावे लागले नाही.  

अमितच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्याचे खऱ्या आयुष्यात अनेक फोटो पाहायला मिळतात. हे फोटो पाहून हेच चंपक चाचा आहेत का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडतो. 

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah babuji aka amit bhatt real life pictures