तारक मेहता का उल्टा चष्माच्या फॅन्ससाठी खुशखबर, या कलाकाराची मालिकेत होणार रिएंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 16:05 IST2020-12-21T16:04:45+5:302020-12-21T16:05:55+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक कलाकार गेल्या कित्येक महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीये. हा कलाकार मालिकेत पुन्हा कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Nattu Kaka aka Ghanshyam Nayak back on the set | तारक मेहता का उल्टा चष्माच्या फॅन्ससाठी खुशखबर, या कलाकाराची मालिकेत होणार रिएंट्री

तारक मेहता का उल्टा चष्माच्या फॅन्ससाठी खुशखबर, या कलाकाराची मालिकेत होणार रिएंट्री

ठळक मुद्देघनश्याम नायक यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना खरी लोकप्रियता ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळेच मिळाली.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील एखादी तरी व्यक्तिरेखा काही भागात प्रेक्षकांना दिसली नाही तर प्रेक्षकांना चुकचुकल्यासारखं होते. तो कलाकार पुन्हा मालिकेत कधी दिसणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. आता या मालिकेतील एका कलाकाराची कित्येक महिन्यांनंतर रिएंट्री होणार आहे. या कलाकारानेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील नट्टू काका हे प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहेत. ही भूमिका घनश्याम नायक साकारत असून त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून चित्रीकरण करत नव्हते. पण आता त्यांची तब्येत सुधारली असून त्यांनी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांचे लाडके नट्टू काका लवकरच त्यांना मालिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहेत. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांनी ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मी १६ मार्चला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण केले होते. पण त्यानंतर तब्येतीमुळे मला काम करणे जमले नाही. आता मी ठणठणीत असून १६ डिसेंबरपासून मी पुन्हा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. बरोबर नऊ महिन्यांनंतर मी कॅमेऱ्याच्या समोर उभा राहिलो आहे.

घनश्याम नायक यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना खरी लोकप्रियता ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळेच मिळाली. या मालिकेतील नट्टू काका हे पात्र प्रचंड प्रसिद्ध आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Nattu Kaka aka Ghanshyam Nayak back on the set