'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

By गीतांजली | Updated: September 30, 2020 13:11 IST2020-09-30T13:00:18+5:302020-09-30T13:11:11+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा म्हणजचे प्रिया आहूजा राजदा कोरोना संक्रमित झाली आहे.

Taarak mehta ka ooltah chashmah priya ahuja rajda aka rita reporter tests corona positive | 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा म्हणजचे प्रिया आहूजा राजदा कोरोना संक्रमित झाली आहे. रिपोर्टर रिटा म्हणजचे प्रियाने स्वत:ही माहिती दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियाने आपल्या फॅन्सना ही माहिती दिली. यानंतर तारक मेहता का उल्टा चष्मामधील जेठालालपासून अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे.. 


प्रियाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह
प्रियाने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक फोटो शेअर करत नोट लिहिली आहे. यात ती म्हणते, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, तुम्हा सगळ्यांना कळवणं माझं कर्तव्य आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीच लक्षण नाहीत. गेल्या 2-3 दिवसांत जे माझ्या संपर्कात आले असतील कृपया त्यांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी. मी अजून शूटिंगला सुरुवात देखील केलेली नाही घरीच आहे, मात्र तरीही मला कोरोना झाला. स्वत:ची काळजी घ्या मास्क लावायला विसरु नका. प्लीज माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा.'

 प्रिया आहुजा राजदाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलगा झाला आहे. अदरासच्या जन्मानंतर प्रिया प्रेग्रेन्सीच्या सुट्टीवर आहे. प्रियाने तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुरेश राजदासोबत लग्न केले आहे. त्या दोघांची ओळख याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah priya ahuja rajda aka rita reporter tests corona positive