तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर, वाचा ही बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:53 PM2020-12-25T19:53:00+5:302020-12-25T19:58:12+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah is back in top five | तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर, वाचा ही बातमी

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर, वाचा ही बातमी

googlenewsNext
ठळक मुद्देटिआरपीच्या रेसमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा पुन्हा अव्वल झाली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. या मालिकेचा टिआरपी चांगलाच वाढला असून या मालिकेचा समावेश पहिल्या पाच मालिकांमध्ये झाला आहे.

टिआरपीच्या रेसमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा पुन्हा अव्वल झाली आहे. बार्कच्या रिपोर्टनुसार, रुपाली गांगुली आणि सुधांशू पांडेची मुख्य भूमिका असलेली अनुपमा ही मालिका एक नंबरवर आहे तर कुंडली भाग्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंडली भाग्य या कार्यक्रमात धीरज धूपर आणि श्रद्धा आर्या यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

तारक मेहता ही मालिका पाचव्या क्रमांकावर असून या आठवड्यात या मालिकेत पिझ्झा पार्टीवरून टप्पू सेनाने घातलेला गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याच्याआधी पोपटलालची नोकरी गेल्यानंतर त्याची झालेली अवस्था आणि त्याला गोकुळधामवासियांनी केलेली मदत दाखवण्यात आली होती. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत प्रेक्षकांना नेहमीच धमाल मस्ती पाहायला मिळते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका दयाबेनची भूमिका साकारत असलेल्या दिशा वाकानीने सोडल्यावर या मालिकेच्या टिआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटत होते. पण दिशाने मालिका सोडून दोन वर्षं झाले असले तरी मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. ही मालिका नेहमीच टिआरपी रेसमध्ये पहिल्या दहा मालिकांमध्ये असते आणि आता तर ही मालिका पहिल्या पाचमध्ये आली आहे. 

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah is back in top five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.