'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:32 IST2025-08-06T14:28:32+5:302025-08-06T14:32:52+5:30
Prajakta Gaikwad : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. उद्या तिचा साखरपुडा पार पडणार आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. प्राजक्ता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्यावरुन तिचे लग्न ठरल्याचे समजले होते. त्यानंतर आता तिने इंस्टाग्राम स्टोरीवर हातावरील मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. त्यातून असे समजते आहे की, उद्या तिचा साखरपुडा होणार आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा उद्या म्हणजे ७ ऑगस्टला साखरपुडा पार पडणार आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या हाता-पायावर मेहंदी काढलेली दिसली. हातावर मेहंदीने तिने एस हे अक्षर काढलेले पाहायला मिळालं. यावरुन तिच्या नवऱ्याचं नाव एस वरुन असल्याचं तिने सूचित केलंय. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, सुरुवात झाली. साखरपुडा. एक दिवस बाकी. तिची ही इंस्टा स्टोरी पाहून चाहते तिच्या साखरपुड्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यांना तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.
पाच दिवसांपूर्वी प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. तिच्या कुंकवाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यात ती नवरीसारखी नटलेली दिसली. तिच्या गळ्यात पुष्पहार होता. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, त्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…. ठरलं कुंकवाचा कार्यक्रम. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला होता. प्राजक्ताचा होणारा नवरा कोण आहे आणि ती कधी लग्नगाठ बांधणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.