स्वप्निल रंगणार लाल इश्क मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 01:55 IST2016-03-18T08:55:30+5:302016-03-18T01:55:30+5:30
स्वप्निल जोशीची मोस्ट अवेटेड फिल्म लाल इश्क.. गुपित आहे साक्षीला आता मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज ...

स्वप्निल रंगणार लाल इश्क मध्ये
या फिल्मची सर्व टिमच या चित्रपटासाठी जबरदस्त उत्सुक असुन सर्वांनी आज फिल्म रिलिझिंग डेटची अनाउन्समेंट केली आहे. अंजना सुखानी पहिल्यांदा मराठी सिनेमात तिच्या अभिनयाची जादु दाखविणार असुन ती म्हणतीये, माझी मराठी फिल्म २७ मे रोजी येतीये. या सर्व कलाकारांची एक्साईटमेंट आपल्याला पहायला मिळत आहे. याबाबत सीएनएक्सने स्वप्निलचा एक्लुझिव इंटरव्ह्यु घेतला असता तो म्हणाला, संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी बॉलीवुडचे कलाकार अगदी लाईन मध्ये असतात. आणि त्यांनी जेव्हा मराठी सिनेमा बनवायचे ठरविले अन त्यातील लीड रोल साठी माझे सिलेक्शन केले यासाठी मी खुपच आनंदी आहे. संजय लीला भन्साली आणि शबिना खान यांच्यासोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी दुग्धशर्करा योगच होता.