स्वप्नील जोशीवर चाहत्यांचा प्रेमाचा पाउस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 10:06 IST2016-03-19T17:04:30+5:302016-03-19T10:06:43+5:30
आज स्वप्नीलच्या अभिनयाची यशाची पावती म्हणून त्याच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रॅम या सोशलमिडीयावर लाखोचा टप्पा पार करत स्वप्नीलवर अक्षरश: प्रेमाचा पाउस पाडला आहे

स्वप्नील जोशीवर चाहत्यांचा प्रेमाचा पाउस
म ाठी इंडस्ट्रीचा शाहरूख खान असणारा आपला लाडका स्वप्नील जोशी या अभिनेत्याने दुनियादारी, तू ही रे, मुंबई-पुणे-मुंबई, मितवा या अशा अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आज स्वप्नीलच्या अभिनयाची यशाची पावती म्हणून त्याच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रॅम या सोशलमिडीयावर लाखोचा टप्पा पार करत स्वप्नीलवर अक्षरश: प्रेमाचा पाउस पाडला आहे. यासाठी स्वप्नीलने सोशलमिडीयावर हटक्या लूकमध्ये एका व्हिडोओच्या माध्यमातून सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच लाखोचा टप्पा पार करणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची व अभिनमानाची गोष्ट असल्याचे स्वप्नीलने सांगितले. प्रेक्षकांच्या या प्रेमाची परतफेड म्हणून संजयलीला भन्साळी दिग्दर्शित लाल इश्क हा चित्रपट खास प्रेक्षकांसाठी घेवून येत असल्याचे देखील यावेळी स्वप्नीलने सांगितले. स्वप्नीलला त्याच्या चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमासाठी लोकमत सीएनएक्सच्यावतीने देखील शुभेच्छा.