स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर बिग बॉसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 09:44 IST2018-05-07T04:14:27+5:302018-05-07T09:44:27+5:30
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस आणि कॅप्टनसीच्या कार्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे प्रेक्षकांनी बघितलं. परंतु हे ...
.jpg)
स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर बिग बॉसमध्ये
क र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस आणि कॅप्टनसीच्या कार्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे प्रेक्षकांनी बघितलं. परंतु हे कार्य करत असताना बऱ्याच सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. सदस्यांनी त्या भावना आठवड्याच्या भागामध्ये तसेच WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर यांच्यासमोर देखील मनमोकळेपणाने व्यक्त केल्या. स्मिता गोंदकर हिने सईच्या शूजच्या लेस कापण, आणि त्यानंतर सईने तिच्या शुजच्या लेस लपवणे असो वा कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान सई आणि जुई मध्ये झालेली बाचाबाची असो. सगळ्यांनीच आपली मते महेश मांजरेकर यांच्यासमोर मांडली. ऋतुजा, सई, जुई आणि पुष्कर यांनी त्यांच्या मनात असलेली नाराजगी व्यक्त केली. काल सदस्यांना एक सरप्राईझ मिळाले ते म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर गेले होते.दोघांचेही घरामध्ये उत्तमरीत्या स्वागत करण्यात आले. घरातील सदस्य देखील या दोघांना बघून खूप खुश झाले. सचिन पिळगावकर घरच्यांना एक संदेश देखील द्यायला विसरले नाहीत.
चोर पोलीस असो वा खुर्चीचा खेळ घरामध्ये चांगलाच रंगला होता. याच दरम्यान झालेल्या कृतींचा राग काही सदस्यांच्या मनामध्ये होता. चोर पोलीस हा खेळ खेळत असताना या दरम्यान रेशम आणि राजेश कडून झालेल्या काही कृत्यांची आठवण ऋतुजाने कालच्या भागामध्ये त्यांना करून दिली ज्याला काही घरचे आज समर्थन देताना दिसणार आहेत. परंतु, यावर महेश मांजरेकर घरच्यांना जाब विचारतील यामध्ये वाद नाही. कालच्या भागामध्ये ऋतुजाने असे देखील बोलून दाखवले कि, कचरा फेकण्यापेक्षा अश्लील बाब या लोकांनी माझायासोबत केली ज्याला माफी नाही. या दरम्यान सुशांत शेलार याला विचारता त्याने देखील ऋतुजालाच पाठींबा दिला. जुईच्या काही गोष्टी घरच्यांना आता खटकू लागल्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे. पुष्करने “जुई घरामध्ये खोट वागत आहे, मी तिला बिग बॉसच्या घराबाहेर भेटू इच्छिणार नाही” असे सांगितले. सई, मेघा, पुष्कर यांना महेश मांजरेकरांनी पाठिंबा देत त्यांनी कॅप्टनसीचा टास्क उत्तमरीत्या पार पाडला असे सांगितले.