स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचा लवकरच होणार साखरपुडा, मेहंदीचा फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 09:11 AM2023-07-22T09:11:26+5:302023-07-22T09:12:04+5:30

Swanandi Tikekar : उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांची लाडकी लेक म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चर्चेत आली आहे

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni's soon-to-be engagement, mehndi photo surfaced | स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचा लवकरच होणार साखरपुडा, मेहंदीचा फोटो आला समोर

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचा लवकरच होणार साखरपुडा, मेहंदीचा फोटो आला समोर

googlenewsNext

उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि आरती अंकलीकर टिकेकर (Aarti Ankalikar) यांची लाडकी लेक म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सध्या चर्चेत आली आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर आमचं ठरलं म्हणत गायक आशिष कुलकर्णीसोबत प्रेमाची कबुली दिली आहे. दरम्यान आता लवकरच स्वानंदी आणि आशिषचा साखरपुडा पार पडणार आहे. स्वानंदीच्या हातावर साखरपुड्याची मेहेंदी सजली आहे. यावेळी आशिष उपस्थित होता. 

स्वानंदीच्या गालावर किस करत आशिषचा या सोहळ्यातील एक खास फोटो स्वानंदीने शेअर केला आहे. या दोघांचा लवकरच साखरपुडा पार पडत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या फोटोंवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. आमचं ठरलं असे म्हणत नुकतेच स्वानंदीने तिच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरुन आशिषच्या प्रेमात असल्याची जाहीरपणे कबुली दिली होती. 

खरेतर स्वानंदी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. आभाळमाया या मालिकेत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. झी मराठीच्या अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेतून सुकन्या कुलकर्णी यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकली होती. स्वानंदी ज्या व्यक्तीसोबत साखरपुडा करत आहे तो आशिष कुलकर्णी गायक आहे आणि त्याने इंडियन आयडॉलच्या बाराव्या सीझनमध्ये सहभाग दर्शवला होता. याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायली आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे. 

Web Title: Swanandi Tikekar and Ashish Kulkarni's soon-to-be engagement, mehndi photo surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.