स्वामी ओमच्या पुन्हा वाजविली कानाखाली, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 18:34 IST2017-01-12T18:34:29+5:302017-01-12T18:34:29+5:30
वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात एका संतापलेल्या महिलेने स्वामी ओमच्या कानशिलात लगावल्याचे आपण सर्वांनी बघितले असेलच. आता पुन्हा असाच काहीसा प्रसंग स्वामी ओमच्या बाबतीत घडल्याचे समोर आले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी झालेल्या स्वामी ओमच्या वक्तव्यावर संतापलेल्या एका व्यक्तीने थेट त्यांच्या कानशिलात लगावली. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याने स्वामी ओम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
.jpg)
स्वामी ओमच्या पुन्हा वाजविली कानाखाली, व्हिडीओ झाला व्हायरल
व त्तवाहिनीवरील चर्चासत्रात एका संतापलेल्या महिलेने स्वामी ओमच्या कानशिलात लगावल्याचे आपण सर्वांनी बघितले असेलच. आता पुन्हा असाच काहीसा प्रसंग स्वामी ओमच्या बाबतीत घडल्याचे समोर आले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी झालेल्या स्वामी ओमच्या वक्तव्यावर संतापलेल्या एका व्यक्तीने थेट त्यांच्या कानशिलात लगावली. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याने स्वामी ओम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
![]()
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या स्वामी ओमने शोचा होस्ट सलमान खान याच्यावर वाट्टेल ते आरोप केले होते. याच विषयावर एका हिंदी वृत्तवाहिनीवर चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्रात स्वामी ओमने नेहमीप्रमाणेच सलमान खान याला चुकीचे ठरवित त्याच्यावर आरोपांची बरसात केली. मात्र स्वामी ओमचे आरोप फेटाळण्यासाठी एक व्यक्ती सलमानच्या बाजूने बोलू लागली. याचाच परिणाम म्हणून दोघांमध्ये जरबदस्त बाचाबाची झाली. प्रकरण ‘तू तू-मै मै’वर येऊन ठेपले. मात्र बोलण्यात नेहमीच आघाडी घेणाºया स्वामी ओमने आपले आरोप मागे घेण्यास सपशेल नकार दिला. यामुळे संतापलेल्या त्या व्यक्तीने स्वामी ओमच्या कानाखाली वाजविली.
मात्र यामुळे संतप्त झालेल्या स्वामी ओमने आरडाओरड करीत गळ्यातील माईक फेकून दिला. तसेच आपल्या सहकाºयांसोबत स्टूडिओमधून धूम ठोकली. परंतु हा सर्व प्रकार कॅमेºयात कैद झाला अन् काही वेळानंतरच स्वामी ओमच्या या नव्या प्रतापाचा व्हिडीओ व्हायरल झाला. स्वामी ओमच्या बाबतीत वृत्तवाहिनीवर घडलेला हा दुसरा प्रकार असून, यापूर्वीदेखील त्यांच्या कानशिलात वाजविलेली आहे.
बिग बॉस या शोमध्ये स्वत:ची लघवी रोहन मेहरा आणि बानी जे यांच्या तोंडावर फेकण्याच्या प्रकारामुळे स्वामी ओमची शोमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी शोचा होस्ट सलमान खान याच्यावर आयएसआय एजंट असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोर बिग बॉसचे निर्माते शोमधील स्पर्धकांना ड्रग्ज सप्लाय करीत असल्याचे म्हटले होते. याच विषयावर आधारित एका वृत्तवाहिनीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. परंतु स्वामी ओमचा तोंडपट्टा थांबण्यास तयार नसल्याने एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली होती.