n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कसोटी जिंदगी की या मालिकेतील सिझान खानने साकारलेली अनुराग बासू ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेला आज अनेक वर्षं होऊनही त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सिझान गेली कित्येक वर्षं छोट्या पडद्यापासून दूर आहे. तो यै है मोहोब्बते या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार होता. त्याने या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरणही केले होते. पण काही कारणास्तव त्याने ही मालिका सोडली. काही दिवसांपूर्वी आणखी एका मालिकेत तो झळकणार असल्याची चर्चा होती. पण प्रोडक्शन हाऊससोबत चर्चा केल्यानंतर कमबॅकसाठी ती भूमिका योग्य नसल्याचे सिझानला वाटले. त्यामुळे त्याने ही मालिका न करण्याचा विचार केला आहे. त्यामुळे सिझानच्या फॅन्सना त्याला पाहाण्यासाठी आणखी काही दिवस तरी नक्कीच वाट पाहावी लागणार आहे.