/> दुनियादारी,क्लासमेट,वंंशवेल सारख्या चित्रपटामध्ये आपल्या कसदार अभिनयाने सर्वांच्याच लक्षात राहिलेल्या सुशांत शेलार या हरहुन्नरी अभिनेत्याने मराठमोळया मातीतल्या खेळासाठी पुढाकार घेतला आहे. वडील उत्तम कबड्डी पट्टु असल्यामुळे या खेळाशी त्याची नाळ जोडली गेलेली आहे. त्यांच्याच स्मरणार्थ उमद्या व नवीन खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन शेलार मामा फाऊंडेशनतर्फे सुशांत शेलारने केले आहे. हे सामने १६ते२० मार्च दरम्यान गिरणगावात होणार आहेत. या सामन्यांचे वैशिष्टय म्हणजे हे सामने ब वर्ग खेळाडुंसाठी आयोजित केले जाणार आहेत. श्रमिक जिमखाना,ना.म.जोशी मार्ग,लोअर परेल डीलाईल रोड मुंबई येथे हे सामने रंगणार आहेत.
Web Title: Sushant organized kabaddi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.