​कुमकुम भाग्य फेम वीण राणाला मिळाले हे सरप्राईझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 14:30 IST2016-12-20T14:30:23+5:302016-12-20T14:30:23+5:30

कुमकुम भाग्य या मालिकेत पुरबची भूमिका साकारणाऱ्या वीण राणाला नुकतेच एक खूप चांगले सरप्राईज मिळाले. या सरप्राईजमुळे सध्या तो ...

Surprisingly, the Kumkum Bhagya Fame has won the Rana | ​कुमकुम भाग्य फेम वीण राणाला मिळाले हे सरप्राईझ

​कुमकुम भाग्य फेम वीण राणाला मिळाले हे सरप्राईझ

मकुम भाग्य या मालिकेत पुरबची भूमिका साकारणाऱ्या वीण राणाला नुकतेच एक खूप चांगले सरप्राईज मिळाले. या सरप्राईजमुळे सध्या तो प्रचंड खूश आहे. 
वीणचा नुकताच वाढदिवस झाला. पण तो सध्या कुमकुम भाग्य या मालिकेच्या चित्रीकरणात प्रचंड व्यग्र असल्याने तो वाढदिवसाच्या दिवशीदेखील चित्रीकरण करत होता. वीणचा संपूर्ण दिवस चित्रीकरणातच जाणार, त्याला काहीही सेलिब्रेशन करायला मिळणार नाही असेच त्याला वाटत होते. पण त्याचा हा वाढदिवस त्याच्या सहकलाकारांनी खूप मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याच्या सहकलाकारांनी सेटवर केक आणून त्याला मोठे सरप्राईज दिले. सहकलाकारांनी दिलेल्या या सरप्राईजमुळे तो खूपच खूश झाला होता. याविषयी तो सांगतो, "मी नेहमीप्रमाणेच माझ्या वाढदिवसालादेखील चित्रीकरण करत होतो. रोज जसा चित्रीकरणचा दिवस असतो, तसाच आजचाही दिवस आहे असे मला वाटत होते. पण माझ्या सहकलाकारांमुळे माझा हा दिवस खूपच स्पेशल बनला. श्रृती झा, शब्बीर आहुवालिया, लीना जुमानी, शिखा सिंग या सगळ्या सहकलाकारांनी आणि सगळ्या तंत्रज्ञांनी मिळून मला खूप छान सरप्राईज दिले. त्यांनी भलामोठा केक आणला होता. खरे तर कुमकुम भाग्य या मालिकेच्या सेटवरचा माझा हा पहिलाच वाढदिवस होता. पण सगळ्यांनी माझा वाढदिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा केला. मला अशाचप्रकारे माझा वाढदिवस साजरा करायला आवडतो. सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी बर्थडे साँग गायले, तसेच माझ्या चेहऱ्यावर केकदेखील थापला. माझा वाढदिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा करण्यासाठी मी माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानतो." 

Web Title: Surprisingly, the Kumkum Bhagya Fame has won the Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.