सरगममध्ये सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 19:21 IST2017-03-23T13:51:18+5:302017-03-23T19:21:18+5:30
सरगम हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना भावत आहे. या कार्यक्रमात आजवर संगीत ...

सरगममध्ये सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर एकत्र
स गम हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना भावत आहे. या कार्यक्रमात आजवर संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावून त्यांची कला एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आणली आहे. पहिल्या भागापासून शंकर महादेवन, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, लोकशाहीर नंदेश उमप यांनी या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर या कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत.
स्वप्नील बांदोडकरने आजवर शंभर मराठी चित्रपटात सुपरहिट गाणी गायली आहेत. तसेच हिंदी, बंगाली, आसामी, गुजराती, तामिळ, भोजपुरी आणि ओरिया अशा अनेक भाषांमध्ये त्याने गाणी गायली आहेत. सुरेश वाडकर हे स्वप्नीलचे गुरु आहेत. सुरेश वाडकरांचा बॉलिवूडमधील दबदबा मोठा आहे. त्यांनी गायलेली लागी आज सावन की, तुमसे मिलके ऐसा लगा, छोड आये हम वोह गलिया यांसारखी अनेक गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. सरगम या कार्यक्रमात नवीन टायलेंट म्हणून त्यांच्या आजीवासनमधील दोन शिष्यांसोबत ते गाणार आहेत आणि त्यातील एक शिष्या दुसरी कोणीही नसून सुरेश वाडकर यांची मोठी मुलगी अनन्या आहे. सरगम या कार्यक्रमात सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर त्यांची अनेक प्रसिद्ध गाणी गाणार आहेत.
सरगम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला कानेटकर कोठारे करत असून या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आदिनाथ कोठारे आहेत. या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे. सिद्धार्थ आणि सौमिल यांनी ते संगीतबद्द केले आहे.
![Suresh wadkar]()