'सूर नवा ध्यास नवा'मध्ये महाराष्ट्राचे भावगंधर्व – संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची हजेरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 09:45 AM2018-01-06T09:45:31+5:302018-01-06T15:15:31+5:30

महाराष्ट्राचे भावगंधर्व म्हणून सुप्रसिध्द असलेले आणि जेष्ठ श्रेष्ठ दिनानाथ मंगेशकर म्हणजेच आपल्या वडीलांचा थोर वारसा जतन करत आपली वाटचाल ...

'Sur Nava Dhaswa Nava' in Maharashtra's Bhavgandharva - Musician Pt. Hridaynath Mangeshkar's presence! | 'सूर नवा ध्यास नवा'मध्ये महाराष्ट्राचे भावगंधर्व – संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची हजेरी!

'सूर नवा ध्यास नवा'मध्ये महाराष्ट्राचे भावगंधर्व – संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांची हजेरी!

googlenewsNext
ाराष्ट्राचे भावगंधर्व म्हणून सुप्रसिध्द असलेले आणि जेष्ठ श्रेष्ठ दिनानाथ मंगेशकर म्हणजेच आपल्या वडीलांचा थोर वारसा जतन करत आपली वाटचाल सुरु केलेले सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली. हृदयनाथ मंगेशकरांनी काही निवडक मराठी आणि हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले असले तरी ते प्रामुख्याने महाराष्ट्राचे भावगंधर्व म्हणूनच ओळखले जातात ते त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळेच. इतकेच नसून हृदयनाथांच्या संगीतात राष्ट्रभक्तीची मोठी जादू आहे. तसेच मराठीतील आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत, जसे की लता दीदींच्या स्वरातील “मोगरा फुलला” हे गाणे. मराठी मनाचे भावविश्व अभिरुचिसंपन्न आणि समृद्ध करण्यात पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. प्रतिभासंपन्न गायक आणि संगीतदिग्दर्शक या दोन्ही भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या आहेत. अश्या जेष्ठ श्रेष्ठ संगीतकारासमोर त्यांचीच काही निवडक आणि सुप्रसिध्द गाणी सादर करण्याची सुवर्णसंधी सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या स्पर्धकांना मिळाली. 

 
'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर या वेळेस गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत रंगली सूर आणि तालाची खास मैफल. महेश काळे यांनी “मर्म बंधातली ठेव ही, सुरत पिया कि आणि प्रिये पहा हे  प्रेक्षकांसमोर सादर करताच सगळे मंत्रमुग्ध झाले. तसेच कार्यक्रमातील स्पर्धकांनी देखील पं. हृदयनाथ मंगेशकर यांचीच काही सुप्रसिध्द गाणी म्हंटली आणि कॅप्टनसची तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथी म्हणजेच पं. हृदयनाथ मंगेशकर यांची वाहवा मिळाली.या आठवड्याच्या भागामध्ये चक्क दोन स्पर्धांमध्ये टाय झाला तो एलिमिनेशन राऊंडमध्येत्या दोन्ही स्पर्धकांना अजून एकदा गाण सादर करण्याची संधी मिळाली.ते दोन स्पर्धक म्हणजे सगळ्यांचे आवडते जितेंद्र तुपे आणि जुईली जोगळेकर. या दोघांमध्ये एक जुगलबंदी रंगली कट्यार मिळविण्यासाठी नाही तर हा मुकाबला रंगला तो म्हणजे कोण या कार्यक्रमामधून बाहेर जाईल हे निश्चित करण्यासाठी. तेंव्हा हे बघणे नक्कीच रंजक ठरणार आहे की, कोण या कार्यक्रमामधून या आठवड्यामध्ये बाहेर जाईल.सगळ्याच स्पर्धकांनी गाणी उत्तम पद्धतीने सादर करून आपल्या कॅप्टनसनचे आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे मनं जिंकले आहे पण या आठवड्यात मानाची सुवर्ण कट्यार कुणाला मिळणार हे बघणंही रंजक ठरणार आहे. 

Web Title: 'Sur Nava Dhaswa Nava' in Maharashtra's Bhavgandharva - Musician Pt. Hridaynath Mangeshkar's presence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.