सुपरस्टार रजनीकांत आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'लिंगा २१' छोट्या पडद्यावर झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 12:08 IST2018-04-17T06:38:37+5:302018-04-17T12:08:37+5:30

गावकऱ्यांसाठी धरण बांधण्यामध्ये आपल्या आजोबांची काय भूमिका होती हे कळल्यानंतर लिंगा ह्या एका भुरट्‌या चोरामध्ये परिवर्तन होते आणि तो ...

Superstar Rajinikanth and Sonakshi Sinha's 'Ligga 21' will be screened on small screens | सुपरस्टार रजनीकांत आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'लिंगा २१' छोट्या पडद्यावर झळकणार

सुपरस्टार रजनीकांत आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'लिंगा २१' छोट्या पडद्यावर झळकणार

वकऱ्यांसाठी धरण बांधण्यामध्ये आपल्या आजोबांची काय भूमिका होती हे कळल्यानंतर लिंगा ह्या एका भुरट्‌या चोरामध्ये परिवर्तन होते आणि तो एका भ्रष्ट राजकारण्यापासून सगळं वाचवण्यासाठी स्वतःला वाहून घेतो. के एस रविकुमार दिग्दर्शित आणि सुपरस्टार रजनीकांत, सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शेट्टी
यांच्या प्रमुख भूमिका असलेला लिंगा हा खराखुरा रजनीकांत स्टाईल ॲक्शन चित्रपट आहे.भारताची ॲक्शन मूव्हीजसाठी वनस्टॉप डेस्टिनेशन झी ॲक्शन शनिवार फाईट क्लब ह्या आपल्या प्रॉपर्टीअंतर्गत शनिवार, २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.ही कथा फ्लॅश बॅकमध्ये सुरू होते. त्यात राजा लिंगेश्वरन रजनीकांत हे एकेकाळी दक्षिण भारतातील राज्यकर्त्यांचे वारस आहेत. ह्या गावातील लोक राजा लिंगेश्वरन यांचे म्हणणे ऐकतात.गोरगरीबांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव असून त्यामुळे गावकऱ्यांचे प्रेम ते जिंकतात.राजा लिंगेश्वरन हे पुढाकार घेऊन ब्रिटिशांना धरण बांधण्याची विनंती करतात.पण त्यांच्या ह्या कल्पनेला विरोध होतो आणि मग ते
पुढाकार घेऊन प्रत्येक गावकऱ्याला विदेशी लोकांच्या मदतीशिवाय धरण बांधायचे आवाहन करतो.मग चित्रपट येतो वर्तमानकाळात.राजा लिंगेश्वरन यांचा मुलगा लिंगा रजनीकांत हा एक भुरटा चोर असून एके दिवशी लक्ष्मी अनुष्का लिंगाला भेटते आणि त्याला त्याच्या आजोबांच्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करायला सांगते. लिंगा तिला नकार देतो आणि गरीबीमध्ये आपल्याला ठेवलेल्या आपल्या आजोबांबद्दल आपल्याला काहीही जाणून घ्यायचे नाही असे तो म्हणतो. तो लवकरच एका चोरीच्या मामल्यात अडकतो आणि मग तो पोलीसांपासून वाचण्यासाठी लक्ष्मीचा प्रस्ताव मान्य करतो. तो लक्ष्मीसोबत त्याच्या गावी जातो.तिथे पोहोचल्यानंतर त्याला त्याच्या परिवाराबद्दलची हृदयद्रावक कथा त्याला कळते.त्याला त्याच्या परिवाराबद्दल काय कळते? त्या मंदिराची काय कथा असते? या सगळ्या गोष्टी रसिकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच एक स्पेशल डान्स करताना बघावयास मिळणार आहे.होय,धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या आगामी ‘यमला पगला दीवाना फिर से’ या चित्रपटात सोनाक्षी जबरदस्त डान्स करताना बघावयास मिळणार आहे.विशेष म्हणजे सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री रेखा हेदेखील एका गाण्यावर ठेका धरताना बघावयास मिळणार आहेत. 

Web Title: Superstar Rajinikanth and Sonakshi Sinha's 'Ligga 21' will be screened on small screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.