सुपर डान्सर मध्ये दिपिका पादुकोण झाली या स्पर्धकाच्या नृत्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 11:21 IST2017-11-23T05:51:34+5:302017-11-23T11:21:34+5:30

सुपर डान्सर या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ...

In the Super Dancer, Deepika Padukone went on to win the title of 'Fidda' | सुपर डान्सर मध्ये दिपिका पादुकोण झाली या स्पर्धकाच्या नृत्यावर फिदा

सुपर डान्सर मध्ये दिपिका पादुकोण झाली या स्पर्धकाच्या नृत्यावर फिदा

पर डान्सर या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनमध्ये देखील शिल्पा शेट्टी, अनुराग बासू, गीता कपूर प्रेक्षकांना परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना यांच्या तिघांमधली केमिस्ट्री खूपच आवडते. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक हे वयाने लहान असले तरी ते अतिशय चांगले डान्सर आहेत. ते आपल्या नृत्यकौशल्यातून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. त्यामुळे आता या सगळ्यांमधून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे. 
सुपर डान्सर या कार्यक्रमात दर आठवड्याला प्रसिद्ध कलाकार येऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवत असतात. या कार्यक्रमाच्या आगामी भागात आता दिपिका पादुकोण हजेरी लावणार असून ती पद्मावती या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात येणार आहे. पद्मावती या दिपिकाच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे असे म्हणत काही लोकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
सुपर डान्सर या कार्यक्रमातील परीक्षक गीता कपूरने दिपिकाच्या एका नृत्याची नुकतीच कोरिओग्राफ़ी केली होती. त्यामुळे गीता आणि दिपिका यांच्यात खूप चांगले ट्युनिंग जमले आहे. दिपिकाने गीतासोबत खूप चांगला वेळ घालवला. त्याचसोबत शिल्पा शेट्टीसोबत दिपिकाने एक मजेदार सेल्फी काढला आणि अनुराग बासूसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. या कार्यक्रमात सहभागी होण्याचा दिपिकाचा खूपच चांगला अनुभव होता. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे नृत्य दिपिकाला आवडले. पण त्यातही कानपूरच्या रितिक दिवेकर आणि त्याचे गुरू प्रतीकच्या जोडीने तिचे विशेष लक्ष वेधले. या दोघांनी ओम शांती ओम मधील 'आँखों में तेरी' या गाण्यावर डान्स सादर केला. या परफॉर्मन्सविषयी दिपिका सांगते, हे माझे सर्वात आवडते गाणे आहे. या गाण्यातील शाहरुखचा अभिनय मला प्रचंड आवडतो. पण या दोघांनी या गाण्याला खूपच चांगला न्याय दिला आहे. 
दिपिका पादुकोणने आपल्या नृत्याचे कौतुक केल्यामुळे रितिक दिवेकर आणि त्याचे गुरू प्रतीक खूपच खूश झाले होते. 

Web Title: In the Super Dancer, Deepika Padukone went on to win the title of 'Fidda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.