पतीला अटक होताच ‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा ‘आऊट’? ही अभिनेत्री बनणार स्पेशल जज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:57 PM2021-07-20T15:57:39+5:302021-07-20T16:01:00+5:30

पोर्नोग्राफी प्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा ‘सुपर डान्सर 4’ शो जज करणार की नाही? असा प्रश्न विचारला जातोय...

super dancer chapter 4 karisma kapoor replace shilpa shetty in upcoming episode as guest judge | पतीला अटक होताच ‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा ‘आऊट’? ही अभिनेत्री बनणार स्पेशल जज

पतीला अटक होताच ‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा ‘आऊट’? ही अभिनेत्री बनणार स्पेशल जज

googlenewsNext
ठळक मुद्देराज कुंद्राला कोर्टाने  २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) दीर्घकाळापासून ‘सुपर डान्सर’ (Super Dancer 4) हा रिअ‍ॅलिटी शो जज करतेय. सध्या या शोचा 4 सीजन सुरू आहे आणि शिल्पा या शोची जज आहे. पण काल पोर्नोग्राफी प्रकरणी शिल्पाचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक झाली आणि आता शिल्पा हा शो जज करणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला. ताज्या माहितीनुसार, ‘सुपर डान्सर 4’च्या येत्या एपिसोडमध्ये तरी शिल्पा दिसणार नाही. यामागे पती राज कुंद्राला झालेली अटक हेच कारण असल्याचे मानले जातेय.
स्पॉटबॉयनं दिलेल्या वृत्तानुसार, आजपासून ‘सुपर डान्सर 4’च्या अपकमिंग एपिसोडचे शूटींग होणार होते. मात्र ऐनवेळी शिल्पाने शोमध्ये येण्यास नकार दिला. तिच्या जागी करिश्मा कपूर (Karisma Kapoor) या एपिसोडमध्ये स्पेशल जज म्हणून उपस्थित राहणार आहे. करिश्मा, गीता कपूर व अनुराग बासू यांच्यासोबत शूटींग सुरू झाले आहे.

शिल्पाने शूटींग सेटवर न येण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. केवळ काही पर्सनल इर्मजन्सी आहे. त्यामुळे मी आज शोवर येऊ शकणार नाही, एवढंच तिने मेकर्सला कळवले. मात्र तिच्या न येण्याचे कारण राज कुंद्राला झालेली अटक असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातोय.
याआधी मे महिन्यातही शिल्पाने शोमधून ब्रेक घेतला होता. तिच्या गैरहजेरीत मलायका अरोरा हा शो जज करताना दिसली होती.
लवकरच शिल्पा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिचा हंगामा 2 हा सिनेमा येत्या 23 तारखेला ओटीटीवर प्रदर्शित होतोय.

राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी 

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला कोर्टाने  २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाचा तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. 

Web Title: super dancer chapter 4 karisma kapoor replace shilpa shetty in upcoming episode as guest judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.