सुनीलने सलमानला करून दिली ऐश्वर्या आणि कतरिनाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 14:41 IST2016-07-07T09:11:38+5:302016-07-07T14:41:38+5:30

सलमान खान सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने द कपिल शर्मा शोच्या सेटवर हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात सुनील ग्रोव्हर ...

Sunil has remembered Aishwarya and Katrina for Salman | सुनीलने सलमानला करून दिली ऐश्वर्या आणि कतरिनाची आठवण

सुनीलने सलमानला करून दिली ऐश्वर्या आणि कतरिनाची आठवण

मान खान सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने द कपिल शर्मा शोच्या सेटवर हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात सुनील ग्रोव्हर सलमानला त्याच्या दोन पूर्वप्रेयसींची आठवण करून देणार असल्याचे म्हटले जात आहे. सलमानच्या जुन्या चित्रपटातील काही गाण्यांवर सुनील नृत्य करणार आहे. कबूतर जा या गाण्यावर नृत्य करताना तो भाग्यश्री बनणार आहे तर चाँद छुपा बादल में या गाण्याच्यावेळी तो ऐश्वर्यासारखे कपडे परिधान करणार आहे. तू ही तो मेरा दोस्त है या गाण्यात तो कतरिनाच्या रूपात दिसणार आहे. आपल्या पूर्वप्रेयसीच्या रूपात सुनीलला पाहून सलमानची काय अवस्था होतेय हे पाहणे नक्कीच मजेशीर असेल. 

 

Web Title: Sunil has remembered Aishwarya and Katrina for Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.