दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:01 IST2025-10-01T12:00:23+5:302025-10-01T12:01:55+5:30
दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली आहे.

दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली; व्हिडीओ व्हायरल
Navratri Mahotsav 2025 : 'द कपिल शर्मा शो' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती नुकतीच दुर्गा पूजा उत्सवात सहभागी झाली होती. दुर्गा पूजा पंडालमध्ये ती पारंपरिक धुनुची नृत्य करताना दिसली. मात्र, नृत्य करत असतानाच तिच्यासोबत अचानक एक अपघात झाला, ज्यातून ती थोडक्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सुमोना अतिशय उत्साहाने धुनुची नृत्य करताना दिसत आहे. परंतु, धुनुची फिरवत असतानाच ती सुमोनाच्या हातातून निसटते आणि धुनुचीतील आग लागलेले पूजा साहित्य खाली पडते. हे साहित्य सुमोनाच्या अंगावरही पडू शकले असते, पण ती त्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावली. अचानक झालेल्या या गोंधळानंतर एक व्यक्ती धाव घेऊन सुमोनाला मदत करतो आणि तिला दुसरी धुनुची देतो. सुमोना लगेच सावरते आणि आपले नृत्य पुन्हा सुरू करते. धुनुचि नृत्य हा एक पारंपरिक धार्मिक नृत्य प्रकार आहे.भारत देशातील पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापूजा उत्सवाच्या काळात हे नृत्य विशेषत्वाने केले जाते.
सुमोनाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या वर्षी 'खतरों के खिलाडी १४' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. सध्या ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. काही दिवसांपुर्वी मराठा आंदोलकाबाबत पोस्ट केल्यावर ती चर्चेत आली होती. सुमोना २०११ मध्ये 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत झळकली होती. त्यानंतर तिने 'कॉमेडी सर्कस' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल शो' हे गाजलेले रिअॅलिटी शो केले.