कपिलची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीवर कोसळला दुःखाचा डोंगर, फोटो शेअर करत झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 03:39 PM2020-10-14T15:39:25+5:302020-10-14T15:40:07+5:30

रूनीचा एक फोटो शेअर करत  त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Sumona Chakravarti on her pet dog Rooney's death: It feels empty, hollow and numb | कपिलची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीवर कोसळला दुःखाचा डोंगर, फोटो शेअर करत झाली भावूक

कपिलची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीवर कोसळला दुःखाचा डोंगर, फोटो शेअर करत झाली भावूक

googlenewsNext

सध्या   सुमोना चक्रवर्तीवर आपला पाळीव कुत्रा रूनीच्या मृत्यूनं दुःखात आहे. गेल्या अनेक वर्षापासून रूनी तिच्या घरात तिच्या सोबत होता. रूनी तिच्यासाठी एक प्राणी नसून कुटुंबाचा एक भाग होता. मात्र काही दिवसांपासून आजारी असलेल्या रूनीचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यामुळं सुमोनाला रूनीच्या अशा अचानक एक्झिटने दुःखात आहे. रूनीचा एक फोटो शेअर करत  त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमोना आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपल्या जीवनातील विविध गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी शेअर करते.रूनीच्या निधनाची बातमीही तिने चाहत्यांसह शेअर केली आहे. विशेष म्हणजे सुमोना नेमहीच रूनीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची.

यावरून रूनीसह असलेले तिचे भावनिक नाते किती घट्ट होते यावरून स्पष्ट होते. रूनीशिवाय आणखीन एक कुत्रा तिच्याकडे आहे. तुर्तास रूनीच्या जाण्याने सुमोना दुःखातून सावरलेली नाहीय. फार एकटं, असहाय्य आणि सुन्न झाल्यासारखं वाटतंय. माझं पहिलं बाळ. माझ्या कायम तुझ्यावर असंच प्रेम राहिल,” अशी पोस्ट सुमोनाने शेअर केली आहे.

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नी लोकांना कॉल करून मागते काम

सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती द कपिल शर्मा या कार्यक्रमात देखील कपिल शर्मासोबत महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी या भूमिकेमुळेच सुमोना ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. या कार्यक्रमामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. टीव्ही इंडस्ट्रीत सुमोनाने आपल्या अभिनयाचे आपले स्थान निर्माण केले आहे.मात्र असे असूनही सुमोनाकडे कपिलच्या शोव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम नाही. साचेबद्ध पठडीचे काम न करता आता तिला दुसरे काही तरी वेगळे काम करण्याचे वेध लागले आहेत.

या प्रसिद्ध कॉमेडियनला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात


सुमोनाला गेल्या अनेक वर्षांपासून एक वाईट सवय होती. पण आता ती वाईट सवय तिने सोडली असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले होते. ती स्मोकिंगच्या पूर्ण अधीन गेली होती, पण तिने दोन वर्षांपूर्वी सिगरेट पिणे पूर्णपणे कशाप्रकारे सोडले याचा उल्लेख  इन्स्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे केला होता. 

Web Title: Sumona Chakravarti on her pet dog Rooney's death: It feels empty, hollow and numb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.