​कपिल शर्माबाबत सुमोना चक्रवर्तीने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:46 IST2017-07-31T06:15:04+5:302017-07-31T11:46:30+5:30

द कपिल शर्मा शो हा गेल्या काही महिन्यांपर्यंत टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल होता. या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर ...

Sumona Chakraborty made a big disclosure about Kapil Sharma | ​कपिल शर्माबाबत सुमोना चक्रवर्तीने केला मोठा खुलासा

​कपिल शर्माबाबत सुमोना चक्रवर्तीने केला मोठा खुलासा

कपिल शर्मा शो हा गेल्या काही महिन्यांपर्यंत टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल होता. या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. पण या कार्यक्रमातील सुनील ग्रोव्हर, अली असगर यांनी काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाला रामराम ठोकला. सुनील आणि अलीने कार्यक्रम सोडल्यानंतर या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस ढासळतच गेली. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची लोकप्रियता चांगलीच कमी झाली आहे आणि त्यातच कपिल शर्मा सतत आजारी आहे. कपिलची तब्येत चांगली नसल्याने कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू व्हायला विलंब होत आहे किंवा अचानकपणे कार्यक्रमाचे चित्रीकरण रद्द करावे लागत आहे. कपिलच्या या आजारपणामुळे द कपिल शर्मा शोमधील सगळेच कलाकार चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत. कपिल लवकरात लवकर बरा होऊ दे यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. या कार्यक्रमात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती याविषयी सांगते, द कपिल शर्मा शोमध्ये आम्ही सगळे कलाकार काम करत असलो तरी हा कार्यक्रम हा कपिल शर्माच्या नावावर आहे. गेल्या काही दिवसांपासून तो खूपच आजारी आहे. त्याची तब्येत ढासळली असल्याने तो देखील टेन्शनमध्ये आला आहे. प्रत्येक वेळी तुमचे शरीर तुम्हाला साथ देईल असे नाही. आपण सगळेच कधी ना कधी आजारी पडतच असतो. पण काही वेळा तुमच्या आजारपणाचा तुमच्या व्यवसायिक आयुष्यावर देखील परिणाम होतो. तसेच कपिलच्या बाबतीत घडत आहे. कपिलला बरे नसल्याने काही वेळा चित्रीकरणासाठी आलेल्या सेलिब्रिटींना थोडा वेळ थांबावे लागत आहे. पण कपिलला बरे नसल्याने ते देखील समजून घेत आहेत. 

Also Read : OMG! ​सुनील ग्रोव्हरने वाढवले त्याचे मानधन... एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतके लाख

Web Title: Sumona Chakraborty made a big disclosure about Kapil Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.