सुमेध मुद्गलकरने पुण्यातील घरी साजरा केला गुढीपाडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:16 AM2020-03-25T11:16:21+5:302020-03-25T11:16:48+5:30

अभिनेता सुमेध मुद्गलकर या वेळी आपल्या घरी पुण्यात आपल्या कुटुंबासमवेत आपला गुढी पाडवा साजरा केला आहे.

Sumedh Mudgalkar celebrates Gudi Padwa at home in Pune | सुमेध मुद्गलकरने पुण्यातील घरी साजरा केला गुढीपाडवा

सुमेध मुद्गलकरने पुण्यातील घरी साजरा केला गुढीपाडवा

googlenewsNext

स्टार भारत वाहिनीवरील लोकप्रिय मालिका राधाकृष्णमध्ये लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. कृष्णा आणि अर्जुनाच्या दृष्टीकोनातून महाभारताची ओळख प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना लवकरच या मालिकेमधील अनेक नवीन पात्रं पाहायला मिळतील. दरम्यान, कृष्णाची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सुमेध मुद्गलकर या वेळी आपल्या घरी पुण्यात आपल्या कुटुंबासमवेत आपला गुढी पाडवा साजरा करत आहे.


कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेता सुमेधा मुद्गलकरने सांगितले की, मी बर्‍याच वर्षांनंतर माझ्या कुटुंबासमवेत गुढी पाडवा साजरा करणार आहे, यासाठी मी खूप उत्साही आहे.

हिंदू दिनदर्शिकेनुसार आमच्यासाठी या सणाला नवीन वर्ष म्हटले जाते. या दिवशी आम्ही गुढीला दाराबाहेर ठेवतो आणि घरात प्रार्थना करतो आणि श्रीखंड किंवा पुराण पोळीसारख्या गोड पदार्थांचा नैवेद्य देवाला अर्पण करतो, एवढेच नाही तर संध्याकाळी आमच्या नातेवाईकांना भेट देतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. परंतु यावेळी आम्ही शासनाच्या आदेशानुसार घरी राहून हा उत्सव साजरा करू आणि बाहेरील कोणालाही शुभेच्छा देण्यासाठी जाणार नाही. जेणेकरुन लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवता येईल आणि त्याचबरोबर मी देवालासुद्धा प्रार्थना करेन
की आपला देश लवकरात लवकर अशा भयंकर परिस्थितीतून बाहेर पडावा आणि आपण एकत्र कोरोनाला हरवू.


सुमेध पुढे म्हणाला की, मी लोकांना आवाहन करतो की या वेळेचा पुरेपूर उपयोग करावा आणि त्यांनी घरी नेहमी जे करायचे आहे ते करावे. बाहेरची परिस्थिती पाहून घाबरून जाण्याऐवजी आपल्या लोकांना काळजी घेण्याचा सल्ला द्या. अशा परिस्थितीत सुमेध मुद्गलकर हा त्याच्या कुटुंबियांसोबत गुढी पाडवा साजरा करायला सज्ज आहे.

Web Title: Sumedh Mudgalkar celebrates Gudi Padwa at home in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.