'एक दूजे के वास्ते' या मालिकेतील सुमन (निकीता दत्ता) हिच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. श्रवण (नमिक पॉल) आणि ...
सुमनच्या आयुष्यात येणार वादळ
/> 'एक दूजे के वास्ते' या मालिकेतील सुमन (निकीता दत्ता) हिच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. श्रवण (नमिक पॉल) आणि त्याची मालिकेतील आई निर्मला (गीतांजली टिळेकर) यांना एकत्र भेटवण्याचा प्रयत्न सुमनलाच भारी पडणार आहे. सुमनच्या या प्रयत्नांमुळे श्रवणच्या वडिलांची भूमिका साकारणारे रामनाथ (सत्यजित शर्मा) नाराज होतात ते सुमन आणि श्रवणची मैत्री तोडतात. इतकंच नाही तर सुमनची कॅटरिंग कंपनी बंद पाडण्यासाठी नोटीस पाठवतात.ही नोटीस श्रवणच्या कंपनीकडून आल्यानं सुमनचाही गैरसमज होतोय. त्यामुळं याला श्रवण जबाबदार असल्याचं सुमनला वाटतंय. त्यामुळं आगामी काळात सुमन आणि श्रवणच्या मैत्रीत वादळ येणार असल्याची चिन्हं आहेत.