‘सुलतान’नं ‘मुन्नी’कडे का केलं दुर्लक्ष ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 17:47 IST2016-07-05T12:17:40+5:302016-07-05T17:47:40+5:30
बॉलीवुडची मुन्नी खानदानात सध्या बदनाम झालीय.. अरबाज खानशी वेगळं झाल्यानंतर मलायका अरोराचे खान कुटुंबीयांशी संबंध फारसे चांगले राहिले नाहीत.. ...
.png)
‘सुलतान’नं ‘मुन्नी’कडे का केलं दुर्लक्ष ?
ब लीवुडची मुन्नी खानदानात सध्या बदनाम झालीय.. अरबाज खानशी वेगळं झाल्यानंतर मलायका अरोराचे खान कुटुंबीयांशी संबंध फारसे चांगले राहिले नाहीत.. याचीच प्रचिती नुकत्याच एका शोमध्येही पाहायला मिळाली.. आपल्या आगामी सुलतान सिनेमाच्या प्रमोशनसाठी दबंग सलमान खान विविध शोमध्ये हजेरी लावतोय.. याच प्रमोशनच्या निमित्ताने सल्लुमियाँ इंडियाज गॉट टॅलेंट या शोच्या सेटवर पोहचला.. विशेष म्हणजे या शोची जजची जबाबदारी सलमानची वहिनी आणि अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा निभावतेय.. यावेळी सुलतान आणि मुन्नीचा आमनासामना होईल, दोघंही एकमेंकांना काही तरी बोलतील असं बोललं जात होतं.. मात्र बॉलीवुडच्या मुन्नीकडे म्हणजेच आपल्या वहिनीकडे ढुंकूनही न पाहता सुलताननं आपल्या सिनेमाचं दणक्यात प्रमोशन केलं.. संपूर्ण शोमध्ये दोघांनी एकही शब्द बोलला नाही. इंडियाज गॉट टॅलेंटच्या पत्रकार परिषदेवेळी अरबाजशी असलेल्या संबंधांबद्दल विचारलं असता वैयक्तिक जीवनाविषयी चर्चा नको म्हणत त्यावर मौन बाळगणं मलायकानं पसंत केलं.. सलमानच्या ऑलिम्पिक वादावर मात्र तिनं प्रतिक्रिया दिली होती.. याचाच अर्थ की तोवर या सलमान आणि मलायकाच्या नात्यात सारं काही आलबेल होतं.. दोघांमध्येही प्रोफेशनल नातं होतं.. मात्र आता सारं काही संपलं असून सगळी नाती तुटल्याचंच इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये दिसून आलं..