सेल्फी मौसी 'सिद्धार्थ सागर' बेपत्ता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:28 IST2018-03-29T07:58:34+5:302018-03-29T13:28:34+5:30

सेल्फी मौसी म्हणजेच स्टँड अप कॉमेडियन सिद्धार्थ सागरबाबत एक धकादायक बातमीसमोर आली आहे. सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता ...

Sulfi aunt missing 'Siddhartha Sagar'? | सेल्फी मौसी 'सिद्धार्थ सागर' बेपत्ता ?

सेल्फी मौसी 'सिद्धार्थ सागर' बेपत्ता ?

ल्फी मौसी म्हणजेच स्टँड अप कॉमेडियन सिद्धार्थ सागरबाबत एक धकादायक बातमीसमोर आली आहे. सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहितीसमोर आली आहे. ही माहिती सिद्धार्थच्या मैत्रिणीने सोशल मीडियावरुन दिली आहे. सिद्धार्थच्या मैत्रिणीने त्याला टॅगकरुन ही माहिती दिली आहे. सिद्धार्थ 2017च्या नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता झाला आहे. 
सिद्धार्थने करिअरची सुरुवात स्टँड अप कॉमेडियन म्हणून केली होती मात्र आज त्याला प्रेक्षक मौसीच्या नावाने ओळखतात. छोट्या पडद्यावरील बऱ्याच कॉमेडी शोमध्ये सिद्धार्थने काम केले आहे.  सिद्धार्थने कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी यांच्यासोबत स्टेज शेअर केला आहे.‘कॉमेडी सर्कस’, ‘लाफ्टर के फटके’, ‘कॉमेडी सर्कस के अजुबे’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला. 'कॉमेडी नाइट्स लाईव्ह' या शो दरम्यान भारतीशी भांडण झाल्यानंतर सिद्धार्थला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. एका अॅक्ट दरम्यान सिद्धार्थ भारतीच्या श्रीमुखात मारायची होती. मात्र सिद्धार्थने ती जोरात मारली. कार्यक्रम संपल्यानंतर याची तक्रार भारतीने प्रोडक्शनकडे केली. यानंतर भारती आणि सिद्धार्थने एकमेकांशी बोलणं बंद केले. 

‘द कपिल शर्मा शो’मध्येही सिद्धार्थ दिसला होता. ‘सेल्फी मौसी’ या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. गेल्या चार महिन्यांपासून सिद्धार्थ नेमका कुठे आहे याची माहिती कुणालाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनीही याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. 


‘बॉलिवूड बबल’च्या रिपोर्टनुसार सिद्धार्थच्या एका मैत्रिणीने फेसबुक पोस्टद्वारे ही धक्कादायक माहिती सगळ्यांसमोर आणली आहे. तुम्हाला सिद्धार्थ सागर आठवतोय का? तो गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. तो माझा चांगला मित्र आहे मला त्याला शोधण्यासाठी मदत करा. अशी पोस्ट तिने लिहिली आहे.  

Web Title: Sulfi aunt missing 'Siddhartha Sagar'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.