पाहा सुख म्हणजे नक्की काय असतं मधील गौरीचे नवे रूप, झाला तिचा मेकओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 11:33 IST2021-05-07T11:30:11+5:302021-05-07T11:33:54+5:30

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आतापर्यंत आपण गौरीला साडी मध्ये पाहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे.

sukh mhanje nakki kay asta gauri makeover | पाहा सुख म्हणजे नक्की काय असतं मधील गौरीचे नवे रूप, झाला तिचा मेकओव्हर

पाहा सुख म्हणजे नक्की काय असतं मधील गौरीचे नवे रूप, झाला तिचा मेकओव्हर

ठळक मुद्देगौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रूपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लुक डिझाईन केला आहे.

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील गौरी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आतापर्यंत आपण गौरीला साडी मध्ये पाहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी जयदीपनेच केलीय. पार्टीमध्ये काय घालायचं, कसं वावरायचं या सगळ्या टिप्स जयदीपने गौरीला दिल्या आहेत.

गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रूपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लुक डिझाईन केला आहे. हा सीन करताना सेटवरही नवा उत्साह संचारला होता. जयदीप गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. हेच प्रेम मालिकेतल्या या नव्या वळणाला सुद्धा मिळेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: sukh mhanje nakki kay asta gauri makeover