n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत दृष्ट नागिणीची भूमिका साकारणारी सुदीपा सिंग सध्या प्रचंड चिडलेली आहे असे म्हटले जात आहे. तिची भूमिका मालिकेत ज्याप्रकारे दाखवली जाते हे तिला आवडत नसल्याची चर्चा आहे. पण ही व्यक्तिरेखा साकारायला मला प्रचंड मजा येत असल्याचे सुदीपाचे म्हणणे आहे. या मालिकेतील माझा लूक हा खूपच वेगळा आहे. मला मेकअप करायलाच जवळजवळ दोन तास लागतात. माझी वेशभूषा ही खूप छान आहे. तसेच या मालिकेत मी अनेक अनेक आभुषणे घालते. हे सगळे घातल्यावर मी एखादी राजकुमारीच आहे असे मला वाटते. इतकी चांगली भूमिका कोणत्या अभिनेत्रीला आवडणार नाही असे ती सांगते.