लोकप्रिय मालिका ४ वर्षांनी घेणार निरोप; कलाकारांची Wrap Up पार्टी , फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:26 IST2025-10-16T17:25:22+5:302025-10-16T17:26:44+5:30
'काजळमाया' या नव्या मालिकेमुळे अनेक जुन्या मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

लोकप्रिय मालिका ४ वर्षांनी घेणार निरोप; कलाकारांची Wrap Up पार्टी , फोटो समोर
स्टार प्रवाह वाहिनीवरील काही मालिका या प्रेक्षकांच्या अगदी जवळच्या आहेत. लोकप्रिय ठरलेली आणि ४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलेली एक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'काजळमाया' या नव्या मालिकेमुळे अनेक जुन्या मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
गेल्या ४ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी 'अबोली' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घ्यायच्या तयारीत आहे. नुकतंच या मालिकेतील कलाकारांची wrap up पार्टी केली. याचे फोटो आणि व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. रात्री ११ वाजता ही मालिका प्रसारित होत होती. मात्र आता लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
दरम्यान, अबोली मालिकेत अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री गौरी कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. त्यानंतर ४ वर्ष मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. या मालिकेत माधव देवचाके, दीप्ती लेले, मीनाक्षी राठोड, मयुरी वाघ, जान्हवी किल्लेकर हे कलाकारही झळकले होते.