स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१, रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 01:35 PM2021-03-19T13:35:47+5:302021-03-19T13:36:16+5:30

Red Carpet Glamorous looks. रेड कार्पेटवरचा कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधणारा होता.

Star Pravah Parivar Awards 2021, glamorous look of artists on the red carpet. | स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१, रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१, रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

googlenewsNext

दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या या वाहिनीवर लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ पाहायला मिळणार आहे. 


'स्टार प्रवाह परिवार' पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला. स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती.

 

रेड कार्पेटवरचा कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधणारा होता. सोहळ्यात रेड कार्पेटवर ग्लॅमरस अवतारात हजेरी लावणा-या अभिनेत्रींकडेही सा-यांच्या नजरा वळल्या होत्या. ब्युटी विथ ब्रेन असलेल्या असलेल्या या स्टायलिश अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याने  
उपस्थितांना घायाळ केले. 


एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला. रविवार ४ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता हा दैदिप्यमान सोहळा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा रसिकांसाठी मनोरंजनाची ट्रीट असणार आहे.

Web Title: Star Pravah Parivar Awards 2021, glamorous look of artists on the red carpet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.