स्टायलीश बाईकवर बसुन मस्तपैकी कुठेतरी लाँग ड्राईव्हला जायचे असे तर प्रत्येकालाच वाटत असते. चित्रपटांमध्ये ...
स्पृहा - सचितची बाईक रायडिंग
/> स्टायलीश बाईकवर बसुन मस्तपैकी कुठेतरी लाँग ड्राईव्हला जायचे असे तर प्रत्येकालाच वाटत असते. चित्रपटांमध्ये असे बाईकवरचे रोमँटिक सीन्स आपल्याला सर्रास पहायला मिळतात. बाईकवर बसलेला हिरो अन त्याला घट्ट मिठी मारुन मागे बसलेली हिरोईन अशाप्रकारचे अनेक सीन्स आपल्याला सिनेमांमध्ये दिसतात. पण आता रोमँटिक हिरो सचित पाटील आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी या दोघांनीही बाईक रायडिंग चा चांगलाच पुरेपुर आनंद घेतला आहे. रेड कलरच्या बाईकवर बसुन दोघेही कुठेतरी चालले आहेत. सचितने ब्लॅक टिशर्ट वर व्हाईट रंगाचा शर्ट घातला आहे तर स्पृहाने थ्रीफोर्थ जीन्स आणि यलो कलरचा स्टनिंग टोप वेअर करुन एकदम ग्लॅमरस लुक केला आहे. या दोघांच्याही भन्नाट बाईक रायडिंगला आपण ऐवढच सांगु की सचित जरा जपुनच रायडिंग कर.