शस्त्रक्रिया करून मुलगी बनला 'स्प्लिट्सविला'चा हँडसम हंक! पण आता 'असं' जगतोय जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:14 IST2025-07-17T13:06:10+5:302025-07-17T13:14:43+5:30
'या' अभिनेत्याने बदललं जेंडर, आता ओळखूही शकणार नाही

शस्त्रक्रिया करून मुलगी बनला 'स्प्लिट्सविला'चा हँडसम हंक! पण आता 'असं' जगतोय जीवन
Gaurav Arora Transformation: एमटीव्ही रिअॅलिटी शो स्प्लिट्सविला हा टीव्हीवरील लोकप्रिय शो आहे. विशेषत: तरुणाईमध्ये हा शो खूप लोकप्रिय आहे. प्रिंस नरुला प्रियांक शर्मा, श्रुती शर्मा आणि दिव्या अग्रवाल अशा बऱ्याच कलाकारांना या शोने प्रसिद्धी मिळवून दिली. 'स्प्लिट्सविला'मधील हे स्पर्धक कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. परंत, या शोमधील एक असा स्पर्धेक होता ज्याची सर्वत्र चर्चा झाली. तो म्हणजे गौरव अरोरा. 'स्प्लिट्सविला'च्या आठव्या पर्वात झळकलेला गौरव अरोरा या स्पर्धकाने चक्क शस्त्रक्रिया करुन तो मुलगी बनला आणि आपली ओळखही बदलली.
काही वर्षांपूर्वी गौरव अरोराने लिंग बदल करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला होता. गौरव गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसला नाही, परंतु तो सोशल मीडियावर बराच सक्रिय राहतो. गौरव आता गौरी या नावाने ओळखला जातो. शस्त्रक्रियेनंतर त्याने आपलं नाव बदललं. जवळपास ९ वर्षांपूर्वी त्याची शस्त्रक्रिया झाली होती. या सर्जरीनंतर त्याने लिप फिलर्स, बोटॉक्स आणि इतर कॉस्मेटिक सर्जर करुन त्याचा संपूर्ण लूक बदलला. आता तो एकाकी आयुष्य जगतो आहे.
आता गौरव अरोराला ओळखणंही कठीण झालं आहे. सध्या गौरव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याचे नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. गौरवने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेले फोटो पाहून अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. त्याच्यात झालेला हा बदल पाहता हा गौरवच आहे ना? असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. गौरव सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पार्थ समथानला डेट करत असल्याचा दावा केल्यानंतर तो अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. अलिकडेच तो एका फॅशन शोमध्ये दिसला होता.