सुप्रिया पाठकसाठी सब्यसाची डिझाईन करणार खास दागिने आणि साड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 13:43 IST2018-03-21T08:13:35+5:302018-03-21T13:43:35+5:30

छोट्या पडद्यावरील सुपरहिट  आणि सर्वात विनोदी मालिका ‘खिचडी’ आता नव्या स्वरूपात पुन्हा प्रसारित होणार असून रसिक पुन्हा हसुन हसुन लोटपोट ...

Specialty jewelery and sarees will be designed for Supriya Pathak! | सुप्रिया पाठकसाठी सब्यसाची डिझाईन करणार खास दागिने आणि साड्या!

सुप्रिया पाठकसाठी सब्यसाची डिझाईन करणार खास दागिने आणि साड्या!

ट्या पडद्यावरील सुपरहिट  आणि सर्वात विनोदी मालिका ‘खिचडी’ आता नव्या स्वरूपात पुन्हा प्रसारित होणार असून रसिक पुन्हा हसुन हसुन लोटपोट होणार आहेत. २००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली.नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता.आत पुन्हा  पारेख कुटुंबीय आणि त्यांचे नवे धाडसी प्रयोग प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार असून ते पाहणे ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.या मालिकेतील आपल्या हंसा या व्यक्तिरेखेमुळे विलक्षण लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुप्रिया पाठक या मालिकेत पुन्हा आपली आवडती भूमिका रंगविता येणार असल्यामुळे खूप आनंदित आणि उत्सुक आहे.या नव्या आवृत्तीत बॉलिवूडचा प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यसाची हा खास तिच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण दागिने आणि बनारसी शालू डिझाईन करणार आहे.“ही मालिका नव्याने सादर करताना त्यात कोणतीही कमी राहु नये याची आम्ही काळजी मालिकेची टीम घेत आहेत.साड्या आणि दागिन्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्ससाठी सब्यसाची प्रसिध्द असून आम्हाला हंसाची व्यक्तिरेखा अगदी खास दाखवायची आहे. सुप्रियालाही आपला लूक खूप खास असावा असं वाटतं. म्हणून ती सुध्दा त्याच्याबरोबर चर्चा करून त्याच्या डिझाईन्सची तिला शोभतील अशाच बनवून घेत आहे.आम्हाला हंसाला अगदी  हटके लूकमध्ये रसिकांसमोर आणायचे आहे.”तसेच रसिकांनी ही मालिका पाहताना पुन्हा पूर्वीच्या मालिकेचा आनंद मिळेल, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे.

खरेतर ड्रेस डिझायनर सब्यासाची जास्त प्रकाशझोतात आला तो विराट आणि अनुष्काच्या लग्नामुळेच.अनुष्काने लग्नात सब्यासाचीने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. लग्नातील तिचा लहेंगा खूपच छान होता.हा लहेंगा देखील सगळ्यांना आवडला होता.अनुष्काने रिसेप्शनलादेखील सब्यासाचीने डिझाइन केलेली साडी घातली होती. या साडीला सोन्याची जर होती. ही साडी हाताने बनवण्यात आली असून ही साडी बनवताना सोन्याचा वापर करण्यात आला होता. ही साडी बनवण्यासाठी कारगिरांनी अनेक महिने लागले होते. या साडीची किंमत पाच लाखांहून देखील जास्त आहे. तसेच तिने घातलेली दागिने देखील प्रचंड महाग होते. अनुष्काने घातलेल्या केवळ झुमक्याची किंमत ही २५-३० लाख रूपये असल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title: Specialty jewelery and sarees will be designed for Supriya Pathak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.