करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरने शेअर केले व्हेकेशनचे स्पेशल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 13:13 IST2017-02-06T07:43:40+5:302017-02-06T13:13:40+5:30
अभिनेता करण कुंद्रा आणि व्हीजे अनुष्का दांडेकर गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यांनी कधीच आपले नाते मीडियापासून लपवण्याचा प्रयत्न ...

करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरने शेअर केले व्हेकेशनचे स्पेशल फोटो
ref="http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/article/11148">अभिनेता करण कुंद्रा आणि व्हीजे अनुष्का दांडेकर गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यांनी कधीच आपले नाते मीडियापासून लपवण्याचा प्रयत्न केला नाही. ते नेहमीच त्या दोघांचे फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करत असतात. ते सध्या एमटिव्हीवरील लव्ह स्कूल सिझन 2मध्येही दिसत आहेत. या कार्यक्रमातील त्यांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.
![karan kundra and anusha dandekar]()
करण आणि अनुष्का त्यांच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून सध्या लॉस एन्जेलिसमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. आपल्या या रोमँटिक ट्रिपविषयी त्या दोघांनीच आपल्या फॅन्सला सोशल नेटवर्किंवरून माहिती दिली आहे. ते सतत आपल्या ट्रिपचे फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करत आहेत. अनुष्काने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोची तर सध्या चांगलीच चर्चा होत आहे. एका फोटोत करणने अनुष्काला उचलले आहे. या फोटोतली त्यांची केमिस्ट्री सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोच्या खाली अनुष्काने एक रोमँटिक कॅप्शनदेखील लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, जेव्हा सुपरमॅन उचलतो...
![karan kundra and anusha dandekar]()
करण कुंद्रा अनुष्कासोबत नात्यात असण्याआधी त्याचे क्रितिका कार्मासोबत प्रेमप्रकरण होते. त्या दोघांची ओळख कितनी मोहोब्बत है या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेतील त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेनंतर ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. पण सतत त्यांच्यात खटके उडत असल्याने त्यांनी ब्रेकअप करण्याचे ठरवले. आज त्यांच्या ब्रेकअपला अनेक महिने झाले असले तरी ते दोघे आजही एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत.