स्पृहाचा अनोखा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 22:14 IST2016-03-03T05:09:51+5:302016-03-02T22:14:20+5:30
एखाद्या चित्रावर कविता करणे खूप कठीण असते. चित्रातील माणसांच्या भावनांचा अंदाज बांधणे व त्याचबरोबर त्या चित्रातील परिस्थिती ओळखून त्या ...
.jpg)
स्पृहाचा अनोखा प्रयत्न
खाद्या चित्रावर कविता करणे खूप कठीण असते. चित्रातील माणसांच्या भावनांचा अंदाज बांधणे व त्याचबरोबर त्या चित्रातील परिस्थिती ओळखून त्या परस्थितीला शब्दरूपात मांडण हे जास्त लोकांना जमत नाही. यासाठी जन्मताच कला अंगी असणे गरजेचे असल्याचे मत अनेक मोठ्या मोठ्या कवींनी मांडले आहे. मराठीचित्रपटसृष्टीत काही हातावर मोजण्याइतकेच कलाकार हे कविता करतात. त्यातली एक स्पृहा... आपल्याला माहिती आहे की, स्पृहा ही उत्तम लेखिका आहे. तिने लोपमुद्रा, चांदचुरा या पुस्ककांचे लिखााण देखील केले आहे, तसेच तिने अंकुष व मुक्ता च्या लव्ह स्टोरीसाठी, म्हणजेच डबल सीट या चित्रपटासाठी किती सांगायच मला हे सुंदर गाणं ही लिहल आहे.परंतु सध्या ती या चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या मूड मध्ये दिसत आहे. स्पृहाने काही प्रसिद्ध पेटिंगसवर कविता करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. स्पृहा जोशीने रेन्वा या चित्रकाराची प्रसिद्ध बोट पार्टी पेंटिंगवर सुंदर कविता रचली आहे. स्पृहा चा हा प्रयत्न चांगला आहेतच. परंतू यावरून पेंटिंग वर कविता करण्याचा नवीन ट्रेण्ड येणार हे नक्की..
![]()